Thursday, August 7, 2025
Home बॉलीवूड आता तर ऋतिक रोशनही म्हणाला, ‘आमिर खानचा सिनेमा म्हणजे, एकदम…’

आता तर ऋतिक रोशनही म्हणाला, ‘आमिर खानचा सिनेमा म्हणजे, एकदम…’

गुरुवारी (दि. ११ ऑगस्ट) ‘लाल सिंग चड्ढा‘ हा सिनेमा चित्रपटगृहात सर्वत्र प्रदर्शित झाला. हा सिनेमा पाहिल्यानंतर अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. त्यापैकीच एक होता सुपरस्टार ऋतिक रोशन. ऋतिकने हा सिनेमा पाहिल्यानंतर कसा वाटला हे सांगितले. चला तर जाणून घेऊया, ऋतिकला हा सिनेमा नेमका कसा वाटला.

अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) याने आमिर खान (Aamir Khan) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) यांचा ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) हा सिनेमा मुंबईतील एका चित्रपटगृहात पाहिला. या सिनेमाला ऋतिकने शानदार सिनेमा म्हटले. त्याने आमिर आणि त्याच्या सिनेमाचे कौतुक केले. ऋतिकने शनिवारी (दि. १३ ऑगस्ट) त्याच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून हा सिनेमा पाहिला. तो चित्रपटगृहातून बाहेर निघतानाही स्पॉट झाला. ऋतिकने ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमाचा रिव्ह्यू त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

ऋतिकने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सिनेमाचा एक पोस्टर शेअर करत लिहिले की, “आताच ‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमा पाहिला. मला हा सिनेमा मनापासून आवडला. प्लस आणि मायनस बाजूला ठेवले, तरी हा सिनेमा जबरदस्त आहे. मित्रांनो हे रत्न चुकवू नका! आताच जावा आणि पाहा. हा खूप सुंदर आहे. खूप सुंदर.” ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

Hrithik-Roshan
Photo Courtesy: Instagram/hrithikroshan

हॉलिवूड सिनेमाचा रिमेक आहे ‘लाल सिंग चड्ढा’
‘लाल सिंग चड्ढा’ हा ऑस्कर पुरस्कार विजेत्या ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलिवूड सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. सिनेमात आमिर खान आणि करीना कपूर यांच्याव्यतिरिक्त नागा चैतन्य आणि मोना सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ऑस्करनेही त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ‘लाल सिंग चड्ढा’ची क्लिप शेअर केली. तसेच, सांगितले की, ऑस्कर विनिंग सिनेमाचा जादू भारतीय व्हर्जनमध्येही उपलब्ध आहे.

‘विक्रम वेधा’मध्ये झळकणार ऋतिक रोशन
ऋतिक रोशन याच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर तो ‘विक्रम वेधा’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा ‘विक्रम वेधा’ या ऍक्शन थ्रिलर तमिळ सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. हा सिनेमा २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये आर माधवन आणि विजय सेतुपती यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे! ब्रा न घालताच कार्यक्रमात पोहोचली प्रियांका चोप्रा, कॅमेऱ्यासमोरचं झाली ‘अशी’ फजिती
भगत सिंगवर बॉलीवूडमध्ये बनले आहे सर्वाधिक चित्रपट, पाहा यादी……
सिद्धू मूसेवालाचे गाणे गाताना मंचावरच कपिल शर्माला कोसळले रडू, ह्रदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा