Tuesday, August 5, 2025
Home बॉलीवूड ‘प्रिय आर्यन…’, ऋतिक रोशनचा आर्यन खानला खुल्या पत्राद्वारे पाठिंबा; वाचा काय लिहिलंय पत्रात

‘प्रिय आर्यन…’, ऋतिक रोशनचा आर्यन खानला खुल्या पत्राद्वारे पाठिंबा; वाचा काय लिहिलंय पत्रात

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान सध्या कठीण काळातून जात आहे. त्याचा मुलगा आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणात अडकला आहे. आर्यन या प्रकरणात अडकल्यानंतर त्याला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यात मिका सिंगपासून ते सुपरस्टार ऋतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझेन खानपर्यंत अनेकांचा समावेश आहे. अशातच आता ऋतिकनेही खुल्या पत्राद्वारे आर्यनला पाठिंबा दर्शवला आहे. ऋतिकने एक भले मोठे आणि प्रेरणादायी पत्र लिहिले आहे. त्याने आर्यनला उद्देशून म्हटले आहे की, वाईट काळच त्याचे भविष्य चांगले बनवणार आहे. मात्र, त्याला स्वत:ला सांभाळायचं आहे आणि स्वत:मधील चांगल्या गोष्टींना तडा जाऊ द्यायचा नाही. आर्यनला शनिवारी (२ ऑक्टोबर) कोर्डेलिया क्रूझवर टाकलेल्या छाप्यादरम्यान एनसीबीने ताब्यात घेतले होते. यानंतर गुरुवारपर्यंत (७ ऑक्टोबर) त्याला एनसीबी कोठडीत ठेवण्यात येणार आहे. ऋतिकने ७ ऑक्टोबर या तारखेसह हे पत्र लिहिले आहे.

समजावून सांगितले आयुष्याचे वास्तव
ऋतिकने लिहिले की, “प्रिय आर्यन, आयुष्य हा विचित्र प्रवास आहे. हे एकप्रकारे चांगलं आहे, कारण हे अनिश्चित आहे. हे चांगलं आहे, कारण कठीण परिस्थिती येतेच, परंतु देव दयाळू आहे. तो केवळ मजबूत लोकांना संकटात टाकतो. तुम्हाला तेव्हा समजते की, तुमची निवड झाली आहे, जेव्हा तुम्हाला संकटादरम्यान स्वतःला सांभाळण्याचाही दबाव जाणवतो. मला माहिती आहे की, तुला हे आता जाणवत असेल. राग, गोंधळ, सक्ती या सर्व गोष्टी तुझ्यातील नायकाला जाळून टाकेल. मात्र, सावध राहा, त्याच गोष्टी तुझा चांगुलपणा, तुझा दयाळूपणा, करुणा, प्रेम या सर्वांनाही जाळू शकतात.” (Superstar Hrithik Roshan Writes Motivational Letter To Aryan Khan About Life And Bad Phase)

“स्वतःला जळूदे, पण एका मर्यादेपर्यंत… चुका, पराभव, विजय, यश हे सर्व सारखेच आहे. जर तुला माहिती असेल की, कोणता भाग तुझ्याकडे ठेवावा आणि कोणता  भाग अनुभवातून बाहेर फेकायचा आहे. परंतु लक्षात ठेव की, या सर्व गोष्टींसह तू अधिक चांगला होऊ शकतो. मी तुला लहानपणापासून ओळखतो आणि मोठा व्यक्ती म्हणूनही ओळखतो. हे स्वीकार, जो काही अनुभव असेल तो स्वीकार. हेच तुझे बक्षीस आहे. विश्वास ठेव. कालांतराने जेव्हा तू या सर्व गोष्टी एकत्र बघशील… मी वचन देतो, तुला सर्व समजेल. जर तू सैतानाच्या डोळ्यात डोकावले आणि शांत राहिला, तर शांत राहा. लक्ष दे. हे क्षण तुझा उद्याचा दिवस घडवत आहेत. उद्या एक तेजस्वी सूर्य चमकत असेल, पण यासाठी तुला अंधारातून जावे लागेल. शांत, स्थिर आणि स्वतःची काळजी घे, प्रकाशावर विश्वास ठेव, तो नेहमी तुझ्या आत आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो यार,” असे पुढे बोलताना ऋतिक म्हणाला.

आर्यन खानला क्रूझ रेव्ह पार्टीमधून ताब्यात घेतले होते. त्याच्यावर आंतरराष्ट्रीय पेडलरशी संपर्कात राहण्याचा आरोप आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे म्हणण आहे की, त्याच्या फोनमधून वादग्रस्त चॅट मिळाले आहेत.

आता आर्यनबाबत न्यायलाय काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘त्या’ व्हिडिओत सलमानने दिलेले वचन केले पूर्ण; शाहरुख संकटात असताना धावला त्याच्या मदतीला

-“तो तुझा बाप होता”, म्हणत अनुपम खेर यांच्या आईने त्यांना फटकारले

-‘हम दो हमारे दो’ सिनेमामुळे प्रेक्षकांची ही दिवाळी ठरणार ‘फॅमिलीवाली’

हे देखील वाचा