Saturday, July 6, 2024

मोठी बातमी! सुपरस्टार पुनीत राजकुमारच्या निधनामुळे कर्नाटकात दु:खी चाहते उतरले रस्त्यावर, कलम १४४ लागू

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पुनीत राजकुमारने शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) या जगाचा निरोप घेतला. तो ४६ वर्षांचा होता. पुनीतची तब्येत बिघडल्यानंतर त्याला बंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुनीतच्या निधनामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण कर्नाटकमध्ये शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर अभिनेत्याच्या मृतदेहाचा फोटो जोरदार व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, परिस्थिती पाहून तिथे कलम १४४ही लावण्यात आले आहे.

कलम १४४ लागू
पुनीतच्या निधनानंतर कर्नाटक राज्यात सर्व चित्रपटगृह बंद केले जात आहेत. पुनीतच्या निधनामुळे दु:खी चाहते रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे चाहत्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईदेखील पुनीतच्या निधनाचे वृत्त ऐकून त्याला पाहण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. (Superstar Puneeth Rajkumar Passes Away section 144 enforced in karnataka)

बोम्मई यांनी पुनीतला श्रद्धांजली वाहत लिहिले की, “डॉ. राजकुमार यांचा मुलगा पुनीत राजकुमारचे कमी वयात निधन होणे कोणत्याही धक्क्याशिवाय कमी नाही. मी वैयक्तिकरीत्या एका मित्राला गमावले आहे. मी त्याचा उत्साह, त्याची प्रतिभा, त्याचे अनेक महान चित्रपट, कन्नडचा सांस्कृतिक राजदूत म्हणून मी त्याचे व्यक्तिमत्व कधीही विसरू शकत नाही.”

याव्यतिरिक्त अनेक कलाकारांनी पुनीतच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अभिनेता आर माधवनने ट्वीट करत लिहिले की, “गेला, सर्वात दयाळू, प्रेमळ आणि उदात्त आत्मा. मला खूप धक्का बसला आहे, भाऊ, आमची मनं तोडून आणि गोंधळात टाकून तू आम्हा सर्वांना सोडून गेला. आज स्वर्ग रोशन झाला आहे. मला अजूनही आशा आहे की, हे खरे नाही. हृदय तुटले आहे.”

अभिनेता सिद्धार्थने ट्वीट करत लिहिले की, “मला विश्वास होत नाहीये की, तू आम्हाला सोडून गेला आहे पुनीत. दयाळू, प्रतिभावान, निर्भीड… तू या जगाला खूप काही दिले. हे योग्य नाहीये भावा. हृदय तुटले आहे.”

अभिनेत्री पूजा हेगडेने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, “विश्वास बसत नाहीये, आयुष्य खूपच अनिश्चित आहे. भारतीय सिनेसृष्टीचं आज खूप मोठं नुकसान झालं आहे. त्याच्या कुटुंबाला या कठीण काळात प्रेम पाठवत आहे. तुझ्या आत्म्याला शांती लाभो पुनीत.”

अभिनेता पुनीतला चाहते ‘अप्पू’ म्हणायचे. तो दिग्गज अभिनेते राजकुमार आणि पर्वतम्मा यांचा मुलगा होता. त्याने २९ पेक्षाही अधिक कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो शेवटचा ‘युवारत्न’ चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट याचवर्षी प्रदर्शित झाला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बिग ब्रेकिंग! अभिनेता पुनीत राजकुमारचे निधन; क्रिकेटर वेंकटेश प्रसाद यांनी ट्विटरवरून दिली माहिती

-‘तुला उर्फीचा आजार चढलाय काय?’ विचित्र ड्रेसमुळे काजोल आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर

-मोठा भाऊ घरी येण्याच्या बातमीने अबराम खान झाला भलताच खुश, व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

हे देखील वाचा