शाहरुख खान आणि गौरी खान यांची प्रेमकहाणी ही एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. लोक त्यांच्यापासून प्रेरणा घेतात. शाहरुख आणि गौरी दोघेही वेगवेगळ्या धर्माचे आहेत. शाहरुख खान मुस्लिम आहे तर गौरी हिंदू आहे. गौरीने लग्नानंतर धर्मही बदललेला नाही.
शाहरुख आणि गौरी प्रत्येक सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. ईद असो वा दिवाळी. शाहरुख मुस्लीम आहे आणि गौरी हिंदू आहे, त्यामुळे त्यांची मुले कोणता धर्म पाळतात हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. गौरी खानने एकदा खुलासा केला होता की तिचा मुलगा आर्यन कोणता धर्म पाळतो.शाहरुख आणि गौरीची खास गोष्ट म्हणजे ते नेहमी मुलांसोबत धर्माबद्दल मोकळेपणाने बोलतात. मुलं आधी भारतीय असतात आणि मग ती कोणत्याही धर्माची असतात, असं ते मानतात. त्यांची मुलेही तेच पाळतात.
गौरी खानने एकदा खुलासा केला होता की तिचा मुलगा आर्यन स्वतःला मुस्लिम म्हणवतो. तो मुस्लिम धर्म पाळतो. तो शाहरुखच्या खूप जवळचा आहे. तो शाहरुखवर खूप प्रेम करतो आणि त्याचा धर्म पाळतो. मात्र, एकदा शाहरुखने सांगितले होते की, आर्यनही गायत्री मंत्राचा जप करतो.गौरी एकदा म्हणाली होती की, मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते पण याचा अर्थ मी धर्मांतर करेन असे नाही. ते माझ्या धर्माचाही आदर करतात. आमच्या घराच्या मंदिरात कुराण ठेवले आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शाहरुख-गौरीचा मुलगा आर्यन इंडस्ट्रीत एंट्री करत आहे. तो अभिनेता म्हणून नाही तर दिग्दर्शक म्हणून काम करतोय. त्याची ही मालिका लवकरच प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा