बॉलिवूडमधील जवळपास सर्वच कलाकार आपल्या अभिनयासोबतच इतर गोष्टींमुळे चर्चेत येत असतात. यासोबतच त्यांची मुलेही माध्यमांचे लक्ष वेधण्यात आपल्या आई- बापांपेक्षा काही कमी नाहीत. असेच काहीसे बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या बाबतीतही आहे. शाहरुखप्रमाणेच त्याची मुलगी सुहाना खानही सध्या चांगलीच चर्चेत आहे. सध्या सुहाना चर्चेत येण्यामागील कारण म्हणजे ती सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे आणि तिथेच तिने शनिवारी (२२ मे) आपला २१ वा वाढदिवस साजरा केला. सध्या तिच्या वाढदिवसाचा पार्टीतील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. तिच्या यातील अदा पाहून चाहतेही फिदा होतील.
सुहानाचा कधीही न पाहिलेला अंदाज
वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यानच्या व्हिडिओमध्ये शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचा कधीही न पाहिलेला अंदाज पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये सुहाना खूपच सुंदर दिसत आहे. सोबतच ती मस्तीच्या मूडमध्येही दिसत आहे. चाहते या व्हिडिओची जोरदार प्रशंसा करत आहेत. सुहाना या व्हिडिओमध्ये फुग्यांसोबत खेळताना दिसत आहे.
फुग्यांसोबत खेळताना दिसली सुहाना
सुहाना शॉर्ट ड्रेसमध्ये जमीनीवर बसलेली दिसत असून ती फुग्यांसोबत खेळत आहे. तिचा हा अंदाज एकदम घायाळ करणारा आहे. तिने राखाडी रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. यासोबतच तिने आपले केसही मोकळे सोडले आहेत. मिनिमल मेकअपसोबत सुहाना आपल्या अदांनी प्रत्येकाला आपल्या प्रेमात पाडत आहे. तिचा हा व्हिडिओ एका सेलिब्रिटी फोटोग्राफरने शेअर केला आहे.
२१ वर्षीय सुहानाचा फोटो
सुहानानेही आपल्या वाढदिवशी आपला एक सुंदर फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती व्हिडिओत घातलेल्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. मोकळ्या आकाशाच्या खाली उभे राहून सुहानाने या फोटोमध्ये पोझ दिला आहे. सुहानाने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “२१.” यासोबत ती सांगत आहे की, ती आता २१ वर्षांची झाली आहे. ती या आऊटफिटमध्ये आपला कर्व्ही फिगर फ्लॉन्ट करत आहे.
सुहानाला मिळाल्या खूप शुभेच्छा!
दुसरीकडे सुहानाची आई गौरी खान हिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुहानाच्या वाढदिवशी अनेक कलाकार तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोबतच तिचे मित्र आणि स्टारकिड्सनेही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…