Sunday, February 23, 2025
Home साऊथ सिनेमा काय सांगता! खुद्द सुपरस्टार यशने लिहिले केजीएफ चॅप्टर २ चित्रपटामधील डायलॉग्स, ‘या’ व्यक्तीने केला खुलासा

काय सांगता! खुद्द सुपरस्टार यशने लिहिले केजीएफ चॅप्टर २ चित्रपटामधील डायलॉग्स, ‘या’ व्यक्तीने केला खुलासा

सध्या दाक्षिणात्य सिनेसृष्टीत एकापेक्षा एक दमदार चित्रपट तयार करण्याची जणू चढाओढ सुरू झाली आहे. एकामागून एक दमदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली यांचा ‘आरआरआर’ चित्रपट सध्या चित्रपटगृहात धुमाकूळ घालत असतानाच, सुपरस्टार यशचा (Yash) ‘केजीएफ चॅप्टर २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली होती. या चित्रपटाबद्दल आता रोज नवनवीन खुलासे सध्या समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘केजीएफ चॅप्टर २’ च्या दिग्दर्शकांनी चित्रपटाच्या कथेबद्दल महत्त्वाचा खुलासा केला होता.

काही दिवसांपूर्वी बंगळुरू येथे झालेल्या ‘KGF Chapter 2’ च्या धमाकेदार ट्रेलर लाँचच्या यशाने खरोखरच हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरणार, असा अंदाज लावला गेला होता. बंगळुरूमधील मेगा ट्रेलर लॉन्च इव्हेंटला खूप यश मिळाले कारण ‘KGF Chapter 2’ च्या कलाकारांनी या कार्यक्रमात चित्रपटात काम करतानाचे त्यांचे अनुभव शेअर केले होते. खरं तर या चित्रपटाच्या ट्रेलरला २४ तासांत १०९ दशलक्षपेक्षा जास्त वेळा पाहिले गेले आणि त्यामुळे चित्रपटाच्या ट्रेलरने आणखी एक रेकॉर्ड मोडलेला पाहायला मिळाला.

रॉकीच्‍या लार्जर दॅन लाइफ कॅरेक्‍टरला, विशेषत: यशने सहजतेने दिलेल्‍या डायलॉग्सना उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन रॉकींग स्टार यशच्‍या चाहत्‍यांनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. अशा परिस्थितीत, ट्रेलर लॉन्चच्या वेळी दिग्दर्शक प्रशांत नील यांनी एक गंभीर खुलासा केला होता. तो म्हणजे खुद्द यशने या सिक्वेलमधील त्याच्या डायलॉग्सच्या मोठ्या भागाची पटकथा लिहिली आहे.

उत्कंठावर्धक कथा, मनाला आनंद देणारे अ‍ॅक्शन सीक्वेन्स, आकर्षक साउंडट्रॅक आणि धमाकेदार परफॉर्मन्ससह, ‘केजीएफ १’ धमाकेदार चित्रपट ठरला होता, ज्याने खरोखरच भारतीय सिनेमाचे सर्व रेकॉर्ड आणि अपेक्षा मोडल्या. १४एप्रिल २०२२ रोजी कन्नड, तेलुगु, हिंदी, तमिळ आणि मल्याळममध्ये देशभरात रिलीज होणारा ‘केजीएफ चॅप्टर २’ हा प्रशांत नील यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे.

प्रशांत नील हे सर्वात यशस्वी असलेल्या दिग्दर्शकांपैकी एक आहेत. होमवेल फिल्म्स या बॅनरखाली विजय किरमंदर यांनी याची निर्मिती केली आहे. हा चित्रपट उत्तर भारतीय चित्रपट जगतात रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंट आणि एए फिल्म्सद्वारे सादर केला जात आहे. सध्या हा चित्रपट चित्रपटगृहात धुमाकूळ घालतोय.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा