Tuesday, April 7, 2026
Home मराठी सुप्रिया पाठारे वाढदिवस: कुटुंबाला हातभार म्हणून केली लोकांच्या घरी धुणी भांडी आज आहे मराठीमधील यशस्वी अभिनेत्री

सुप्रिया पाठारे वाढदिवस: कुटुंबाला हातभार म्हणून केली लोकांच्या घरी धुणी भांडी आज आहे मराठीमधील यशस्वी अभिनेत्री

मराठीमध्ये अनेक असे कलाकार आहेत जे उत्तम अभिनय करतात. मात्र असे खूप कमी कलाकार आहेत जे त्यांच्या वाट्याला आलेल्या लहान मोठ्या कोणत्याही भूमिकेशी एकरूप होऊन काम करतात. अशाच एक अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे. सुप्रिया यांनी त्यांच्या मोठ्या कारकिर्दीमध्ये विनोदी, सहायक, नकारात्मक, गंभीर आदी सर्वच प्रकारच्या भूमिका अगदी लीलया साकारल्या. सुप्रिया यांचे नाव उच्चारले की डोळ्यासमोरून त्यांच्या अनेक भूमिका सर्रकन निघून जातात. सुप्रिया यांनी शून्यातून सुरवात करत आज एवढे यश मिळवले आहे. आज ९ एप्रिल सुप्रिया त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे, त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या अभिनय प्रवासाबद्दल.

बहुतकरून सहायक भूमिकांमधून सुप्रिया यांनी त्यांची प्रतिभा जगासमोर आणली. अभिनयाची कोणतीही समज नसताना त्यांनी या क्षेत्रात येत यश मिळवले. सुप्रिया पाठारे यांनी खूप सुरुवातीच्या काळात लोकांच्या घरी धुणी-भांडी करण्याचे काम केले. सुप्रिया या भरतनाट्यम डान्सच्या क्लासेसला जायच्या त्यासाठी त्यांना 70 रूपये द्यावे लागायचे. ही फी भरण्यासाठी त्या धुणी भांडीची काम करायच्या आणि त्यातून त्यांना मिळणारे शंभर रूपये घेत ७० रुपयर क्लासची फी आणि उरलेले ३० रूपये आईला द्यायच्या. अशाप्रकारे त्या 18 घरात जाऊन हे काम करायच्या. चार भावंडांमध्ये सुप्रिया सर्वात मोठ्या. कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी म्हणून त्या भांडी घासायच्या कामाबरोबरच कधी रस्त्यावर अंडी विकणं, चणे विकायला जाणं, कधी दुधाच्या बाटल्या घरोघरी नेऊन देणं अशी काम देखील करायच्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Supriya Pathare (@supriya_pathare75)

सुरुवातीला अनेक लहान सहन भूमिका करणाऱ्या सुप्रिया यांच्या आयुष्यात २०१० हे साल महत्वाचे ठरले. याआधी देखील त्यांनी अनेक भूमिका केल्या, त्या गाजल्या देखील मात्र २०१० साल खास होते. यावर्षी आलेल्या फू बाई फू या विनोदी मालिकेमुळे त्यांना अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. सुप्रिया पाठारे आणि भाऊ कदम यांची जोडी बरीच गाजली होती. त्यानंतर २०१३ साली आलेल्या होणार सुनं मी या घरची या मालिकेमुळे त्यांना वेगळी ओळख मिळाली.

सुप्रिया पाठारे यांची लहान बहिण म्हणजेच अभिनेत्री अर्चना नेवरेकर. अर्चना नाटकात काम करायच्या आणि सुप्रिया त्यांच्याबरोबर सोबत म्हणून जायच्या. सोबत येण्याचे अर्चना सुप्रिया यांना 100 रुपये द्यायच्या. सुप्रिया यांच्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात नाटकांपासून झाली. त्यांनी ‘फू बाई फू’, ‘जागो मोहन प्यारे’, ‘होणार सुन मी या घरची’, ‘मोलकरीण बाई’, ‘चि. व चि.सौ.का’ अशा लोकप्रिय चित्रपट आणि मालिकांमधून कामे केली. सध्या त्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून दिसत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अण्णांचा हटके अंदाज! नागराज मंजुळने वाजवली हलगी अन् आकाश-सायलीने केला भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल

आपल्या विवादित आणि मुक्त वक्तव्यांमुळे सतत चर्चित असणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखले का?

हे देखील वाचा