सुरभि चंदना ही टीव्हीची एक प्रसिद्ध अभिनेत्री असून, तिच्या चाहत्यांची संख्या लाखात आहे. दरदिवशी सुरभी तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करते. जबरदस्त चाहतावर्ग असल्याकारणाने, तिचे फोटो आणि व्हिडिओ खूप व्हायरल होतात. अशाच परिस्थितीत, अभिनेत्रीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती बी प्राकच्या ‘बारिश की जाए’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे. सुरभि या व्हिडिओमध्ये, लाल रंगाच्या कपड्यात ग्लॅमरस स्टाईलमध्ये बेडवर फोटोशूट करत आहे. सुरभि चंदनाचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.
तिचा हा व्हिडिओ शेअर करत सुरभिने लिहिले आहे की, “गरमी इतकी आहे की पाऊस येऊदे.” सुरभिच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कंमेट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत एका चाहत्याने लिहिले, “मॅम तुम्ही पाऊसच काय तर आगही लावू शकता.” तर त्याच वेळी दुसर्या युजरने लिहिले की, “तुमच्या फोटोंची प्रतीक्षा करत आहे. लवकरच फोटो पोस्ट करा.” अशाप्रकारे, सुरभिच्या या व्हिडिओला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत आहे आणि तिचे कमेंट सेक्शन हार्ट आणि फायर इमोजीने अगदी तुडुंब भरले आहे.
टीव्हीचा प्रसिद्ध शो ‘इश्कबाज’ मध्ये सुरभि चंदना दिसली होती. या शोमध्ये सुरभिचे पात्र लोकांना चांगलेच आवडले होते. या शोमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. यानंतर सुरभि घराघरात तिचे पात्र ‘अनिका सिंह ओबेरॉय’च्या नावाने प्रसिद्ध झाली. या शोमध्ये नकुल मेहतासोबत तिची चांगलीच जोडी जमली होती. सुरभि चंदना अखेरच्या वेळेस ‘नागीन 5’ मध्ये बानीची भूमिका साकारताना दिसली होती.