तर अखेर समोर आलंच! मंडळी ‘हा’ आहे हिट आणि फिट सुरभी चंदनाच्या तंदुरुस्तीचा राज


आजकाल अभिनेत्री असो किंवा अभिनेता सर्वांना त्यांच्या फिटनेसची काळजी घ्यावीच लागते. फिटनेससाठी कलाकार अनेक वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करत असतात. मागील काही काळापासून फिटनेससाठी झुंबा हा प्रकार खूपच प्रसिद्ध झाला आहे. कलाकारदेखील अनेकदा झुंबा करताना दिसतात. अशीच एक झुंबाप्रिय असणारी अभिनेत्री म्हणजे सुरभी चंदना.

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींच्या यादीतील एक नाव म्हणजे सुरभी चंदना. सुरभी जितकी सुंदर आहे तितकीच फिट देखील. नेहमी ती तिच्या फिटनेसची काळजी घेत असते. सुरभीने नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये सुरभी झुंबा करताना दिसत असून, तिच्या या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत तिचे झुंबा ट्रेनर्स देखील दिसत आहे.

सुरभीने हा व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले आहे की, ” माझ्या झुंबा ट्रेनर्ससोबत मी खूप मजा करत असते.” सुरभीच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर भरपूर हिट्स आणि लाइक्स मिळत आहे. शिवाय तिच्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स देऊन फॅन्स तिची स्तुती करत आहेत.

सुरभीने अनेक मालिकांमधून तिच्यातील प्रतिभासंपन्न अभिनेत्रींचे दर्शन सर्वांना घडवले. सुरभीने या क्षेत्रात कोणाच्याही पाठिंब्याशिवाय स्वबळावर आपली दमदार ओळख तयार केली. ती अनेक मालिकांमधील लहान मोठ्या भूमिका साकारत पुढे गेली. तिला इश्कबाज या मालिकेतून तुफान लोकप्रिय मिळवून दिली. नुकतीच ती एकता कपूरच्या नागिन या मालिकेत देखील दिसली होती.


Leave A Reply

Your email address will not be published.