कलर्स मराठीवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘तुझ्या रूपाचं चांदन’ मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मालिकेत काही दिवसांआधीच ‘दत्ता’ची एंट्री झाली. रोहित निकम ही भूमिका साकारत असून त्याच्या लूकची चर्चा सगळीकडेच आहे. नक्षत्राला नरकच्या दारातून खेचून, नक्षत्राचं दु:ख कसे दूर करेल, तिचं रक्षण कसं करेल हे मालिकेत बघायला मिळणार आहे.
दत्ता आणि नक्षी आता संकट अडकले असून ते या संकटातून कसे बाहेर पडतील हे लवकरच कळेल. मालिकेमध्ये मयूर मोरे याची भूमिका आपल्या सगळ्यांचा लाडका सुशांत शेलार साकारात आहे. तर आता मालिकेमध्ये अजून एक नवीन एंट्री होणार आहे आणि ती म्हणजे महेश्वरी यांची ही भूमिका सुरेखा कुडची साकारणार आहे. (surekha kudachi enter in tujhya rupach chandan serials)
याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, “आतापर्यंत तुम्ही मला बर्याच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिले आहे. याचसोबत कलर्स मराठीवर्ल बिग बॉस मराठी पर्व तिसरेमध्ये तुम्ही मला भरभरून प्रेम दिले. या घरातून बाहेर पडल्यावर मी आता पुन्हा एकदा येते आहे तुमच्या भेटीला एका नव्या भूमिकेत. दत्ताच्या आईची ही भूमिका असून महेश्वरी पाटील ही भूमिका करताना मला मनापासून खूप आनंद होतो आहे. या भूमिकेत एक वेगळेपणा आहे कारण ही स्त्री राजकीय क्षेत्रामध्ये आहे.विषय थोडा वेगळा आहे तुम्हांला हे बघताना नक्कीच कळेल.”
बिग बॉस मराठीच्या घरात सुरेखा जास्त दिवस राहिली नाही. कमी व्होट मिळाल्याने ती काही दिवसातच घराबाहेर गेली. परंतु घरातील तिचा वावर आणि प्रवास एकंदरीत मनोरंजक होता. तिच्या विनोदी बुद्धीने तिने सगळयांना आपलेसे केले होते. ती घरातून बाहेर जाताना घरातील सगळे सदस्य रडले होते. त्यानंतर तिच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली. सुरेखा कुडचीने याआधी सोनी मराठीवरील नवरी मिळे नवऱ्याला या मालिकेत काम केले आहे. तिने अनेक चित्रपटात देखील काम केले आहे.
हेही वाचा :
शिवानी बावकरने धरला ‘मेरा यार’ स्टेप्सवर ठेका, स्टाईलिश लूकने घातली चाहत्यांना भुरळ
बिग बॉस १५: देवोलीना भट्टाचार्जीच्या मते तेजस्वी प्रकाश आहे अस्वच्छ, म्हणाली ‘ती ब्रशशिवाय…’