Saturday, July 6, 2024

अभिनेता सूर्याने चित्रपटाच्या टीमला वाटले ‘इतक्या’ कोटींचे सोने, काय आहे कारण?

तामिळ चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता सूर्या सध्या त्याच्या आगामी ‘एथरक्कुम थुनिंधवन’ या चित्रपटासाठी चर्चेत आहे. नुकतेच त्याने दिग्दर्शक पंडिराजसोबत या चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण केले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक पंडिराज यांनी स्वत: त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ही माहिती दिली आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर पंडिराज यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे.

पंडिराज यांनी लिहिले की, “मी माझे प्रोडक्शन हाऊस, सन पिक्चर्स, आमचे हिरो सुरिया सर आणि कॅमेरामन रत्नवेलू यांचे मला आणि माझ्या टीमला पाठिंबा दिल्याबद्दल मनापासून आभार मानतो. मी तुम्हाला लवकरच याबद्दल अधिक अपडेट देईल.” चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर, सुपरस्टार सूर्या त्याच्या एका महान कामामुळे चर्चेत आहे.

सूर्याने त्याच्या चित्रपटाच्या टीमला दिली सोन्याची नाणी
सूर्याने ‘एथरक्कुम थुनिंधवन’च्या टीमला १ कोटी रुपयांचे सोने भेट दिले आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, सूर्याने ‘एथरक्कुम थुनिंदावन’च्या सर्व कलाकारांना आणि टेक्नीशियन्स १ कोटी रुपयांची सोन्याची नाणी भेट म्हणून दिली आहेत. त्याच्या या भेटीमुळे चित्रपटाच्या टीमचे लोक खूप खूश आहेत.

सूर्या महिलांसाठी लढणार
जर आपण चित्रपटातील सूर्याच्या व्यक्तिरेखेबद्दल बोललो, तर तो या कथेत एक मजबूत सामाजिक सेनानी म्हणून काम करेल. ‘एथरक्कुम थुनिंधवन’मध्ये सूर्या महिलांच्या सुरक्षेसाठी संघर्ष करताना दिसणार आहे. त्याच्या विरुद्ध तामिळ-तेलुगू सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका मोहन दिसणार आहे.

सामाजिक विषयांवर आधारित या चित्रपटात सूर्या आणि प्रियांका मोहन यांच्याशिवाय सत्यराज, सरन्या पोन्नवनम, सुरी आणि सरन हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे संगीत डी इमान यांनी दिले असून, हा चित्रपट सन पिक्चर्स निर्मित आहे. चित्रपट निर्मात्यांनी अद्याप ‘एथरक्कुम थुनिंधवन’च्या प्रदर्शनाची तारीख अधिकृतपणे उघड केलेली नाही. मात्र आता या कथेसाठी चाहत्यांना जास्त वाट पाहावी लागणार नाही. जर या चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शनचे काम लवकर संपले, तर तो २३ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होऊ शकतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा