Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड सुशांत सिंगच्या वाढदिवसाच्या दिवशी बहिणींनी दिला भावाच्या आठवणींना उजाळा, शेअर केले व्हिडिओ आणि फोटो

सुशांत सिंगच्या वाढदिवसाच्या दिवशी बहिणींनी दिला भावाच्या आठवणींना उजाळा, शेअर केले व्हिडिओ आणि फोटो

आज (२१ जानेवारी) दिवंगत अभिनेता सुशांत सिग राजपूतचा वाढदिवस आहे. आज जर सुशांत आपल्यामध्ये असता तर तो आज त्याचा ३७ वा वाढदिवस साजरा करत असता. सुशांतने २०२० साली आत्महत्या केली आणि एकच गोंधळ उडाला. सुशांतच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या बहिणींनी त्याचा एक अनसीन व्हिडिओ शेअर केला आहे. सुशांत गेल्यानंतर त्याचे अनेक कधीही न पाहिलेले व्हिडिओ आणि फोटो त्याच्या फॅन्सला पाहायला मिळाले. आता त्यांना सुशांतचा असाच एक व्हिडिओ पाहायला मिळत आहे.

सुशांत सिंगची बहीण असलेल्या श्वेता सिंगने एक व्हिडिओ शेअर करत सांगितले की, त्याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. श्वेताने तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “भावाच्या वाढदिवसाच्या दिवशी मी त्याच्या काही आठवणींना तुमच्यासोबत शेअर करत आहे. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा कसे होतो ते यातून दिसेल. माझ्यात आणि सुशांतमध्ये केवळ एक वर्षाचे अंतर आहे. आम्हाला दोघांना आमचे संपूर्ण कुटुंब ‘गुडिया गुलशन’ नावाने आम्हाला हाक मारायचे. घरातील गोड पदार्थ, मिठाई आम्ही मिळून खायचो.”

श्वेता पुढे म्हणते, “जेव्हा उन्हाळ्यातील सुट्ट्या सुरु झाल्या की आम्ही खूप मस्ती करायचो. घरातील सर्व झोपले की आम्ही ऍक्टिंग करायचो. आमच्या गॅरेजमध्ये जाऊन आम्ही खूप खेळायचो.” श्वेतासोबतच सुशांतची दुसरी बहीण असलेल्या प्रियंकाने देखील त्याच्या फॅन्सला सुशांतच्या वाढदिवसाच्या दिसव्ही भटक्या कुत्र्यांना घर मिळण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. तिने सांगितले की, सुशांत आणि फज यांना श्रद्धांजली देण्यासाठी डॉग शेल्टरमध्ये जा आणि त्यांना खाऊ पिऊ घाला.”

तत्पूर्वी सुशांतने १४ जून २०२० रोजी मुंबईतील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. आजपर्यंत त्याची आत्महत्या होती की हत्या की बाब उकलू शकलेली नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दाक्षिणात्य अभिनेत्री शुभ्रा अय्यप्पाने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप केले लग्न, पाहा भन्नाट फाेटाे

इंडियन आयडॉलमध्ये रीना रॉयचे कौतुक पडले शत्रुघ्न सिन्हा यांना महागात; पत्नी म्हणाली, ‘तू घरी…’

हे देखील वाचा