नवी दिल्ली । सुशांत सिंग रजपूतला न्याय मिळावा म्हणून त्याचा एकवेळचा मित्र गणेश हिवरकर (Ganesh Hiwarkar) आणि सुशांतचा पर्सनल असिस्टंट अंकित आचार्य (Ankit Acharya) गुरुवारी दिल्लीला पोहचले. ते दोघे २ आक्टोबरला गांधी जयंतीचे औचित्य साधून उपोषणाला बसणार होते. परंतू दिल्लीत पोहचताच त्यांना दिल्ली पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
हिवरकर यांनी काही दिवसांपुर्वीच अंकितसोबत ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात त्यांनी २ ऑक्टोबर रोजी उपोषणावर बसण्याचे सुतोवात केले होते. ते दोघे गुरुवारी जसे दिल्ली एअरपोर्टवर पोहचले तसे त्यांना दिल्ली पोलीसांनी थांबवले व ताब्यात घेतले.
बॉलीवूड अभिनेता सुशांतच्या मृत्युप्रकरणी एम्स हॉस्पिटलने सीबीआयला रिपोर्ट हस्तांतरित करण्यात आली. सध्या सीबीआय एम्सच्या रिपोर्टचे विश्लेषण करण्यात व्यस्त आहे. या प्रकरणात सीबीआय जो निर्णय घेणार आहे तो अंतिम मानला जाणार आहे. सीबीआयकडे पहिल्यापासून असलेल्या काही पुराव्यांसह नव्याने येणाऱ्या विश्लेषणाच्या जोरावर सुशांतने आत्महत्या केली की त्याचा खून झाला यावर निर्णय़ घेतला जाणार आहे.