Saturday, June 29, 2024

यापेक्षा वाईट काय नसतंय! स्वत:चा शेवटचा सिनेमाही न पाहाता जगाचा निरोप घेतलेले कलाकार

या मातीत जो जन्माला येतो तो मृत्यूनंतरही या मातीतच मिसळून जातो. मागे राहतात त्या फक्त त्यांच्या आठवणी! सामान्य माणसाच्या मृत्यूनंतर कालांतराने तो सर्वांच्या विस्मृतीत जातो. परंतु चित्रपट क्षेत्रातील कलाकार याबाबतीत जर भाग्यवानच म्हणायला हवेत. हे कलाकार आपल्याला सोडून गेल्यावर त्यांच्या कलाकृती या आपल्यासाठी आणि जगासाठी चिरकाल समरणात राहणाऱ्या कलाकृतीच असतात, ज्यामधून ते दिवंगत कलाकार नेहमीच आपल्या भेटीस येत असतात. काही कलाकार असे असतात ज्यांच्या नशिबात स्वतःचीच अखेरची कलाकृती पाहणं देखील नसतं. चला तर मग पाहुयात मंडळी कोणकोणते असे कलाकार आहेत आणि त्यांच्या शेवटच्या कलाकृतीसुदधा!

सुशांतसिंग राजपूत – दिल बेचारा
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतने १४ जून २०२० रोजी वांद्रे येथील फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनानंतरच्या दुसर्‍या महिन्यात त्याचा ‘दिल बेचारा’ हा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला. २४ जुलै रोजी हा चित्रपट डीझने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला होता, ज्याला आयएमडीबीवर काही दिवसांत सर्वोच्च क्रमांकाचा चित्रपट बनण्याचा बहुमान मिळाला. सुशांतचं निधन झाल्यानंतर त्याचा शेवटचा चित्रपट प्रत्येकासाठी भावनिक ब्रेकडाउन होता. या चित्रपटातून संजना सांघीने बॉलिवूडमध्ये मुख्य भूमिका साकारत पदार्पण केले होते. योगायोग पहा सुशांतचा अखेरचा हा चित्रपट मुकेश छाबरा यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होता.

श्रीदेवी – झिरो
२४ फेब्रुवारी २०१८ रोजी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला होता. दुबईतील एका हॉटेलमध्ये अपघातामुळे, भाचा मोहित मारवाहच्या लग्नाला भाग घेण्यासाठी गेलेल्या श्रीदेवींचा मृत्यू झाला. शाहरुख खान, कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा स्टारर चित्रपट झिरोमध्ये त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. त्यांच्या निधनानंतर डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

ओम पुरी – ट्युबलाईट
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे ६ जानेवारी २०१७ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूच्या एक महिन्यापूर्वी ओम पुरी यांनी आपला शेवटचा चित्रपट ट्यूबलाइटचं चित्रीकरण पूर्ण केलं होतं, ज्यात सलमान खान मुख्य भूमिकेत होता. त्याचवर्षी ईदच्या निमित्ताने २५ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ओम यांना त्यांचा अखेरचा चित्रपटदेखील पाहता आला नाही.

राजेश खन्ना – रियासत
बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांनी मृत्यूपूर्वी रियासात या चित्रपटात अभिनय केला होता, परंतु राजेश खन्ना यांचा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच १८ जुलै २०१२ रोजी कर्करोगाने निधन झालं. राजेश खन्ना यांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर दोन वर्षांनंतर त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त रियासत हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता.

दिव्या भारती – शतरंज
बॉलिवूड कारकिर्दीच्या सुरुवातीला दिव्या भारती अनेक उत्कृष्ट चित्रपटांत काम करून सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री बनली होती. बर्‍याच हिट चित्रपटांनंतर दिव्या भारतीचा शतरंज हा चित्रपट १९९३ मध्ये प्रदर्शित झाला होता, पण प्रदर्शनापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. त्याच वर्षी दिव्याचा तिच्या इमारतीच्या बाल्कनीतून खाली पडल्यानंतर ५ एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. निधनाच्या अगोदर दिव्याने अक्षय कुमारबरोबर चित्रपट ‘परिणाम’ ही साइन केला होता, परंतु तिच्या निधनानंतर हा चित्रपट कधीच बनू शकला नाही.

मधुबाला – ज्वाला
हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध चित्रपट ‘मुगल-ए-आजम’ या चित्रपटात अनारकलीची भूमिका साकारणार्‍या मधुबाला यांचे हृदयातील छिद्रांमुळे २ फेब्रुवारी १९६९ रोजी निधन झालं. त्यांच्या मृत्यूनंतर दोनच वर्षांनी त्यांचा ज्वाला हा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला जो खूप हिट ठरला. या चित्रपटात दिवंगत अभिनेत्री मधुबाला, सुनील दत्त, आशा पारेख आणि ललिता पवार यांच्या मुख्य भूमिका आहेत.

स्मिता पाटील – गलियो के बादशाह
अर्थ, मिर्च मसाला, मंथन यासारख्या अनेक हिट चित्रपटात दिसलेल्या स्मिता पाटील यांचे १३ डिसेंबर १९८६ रोजी निधन झालं. मुलगा प्रतीक बब्बर याला जन्म दिल्यानंतर दोन आठवड्यातच स्मिता पाटील यांचे प्रसूतीमधील काही बिघडांमुळे निधन झाले होते. स्मिता यांचा अखेरचा चित्रपट, गलियो के बादशाह त्यांच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी १७ मार्च १९८९ रोजी प्रदर्शित झाला. या लघुपट कारकीर्दीत अभिनेत्रीने ८० हून अधिक चित्रपट केले आहेत.

फारुख शेख – यंगिस्तान
लोकप्रिय अभिनेता आणि टीव्ही प्रस्तुतकर्ता फारूक शेख यांचे दुबईत परिवारासोबत सुट्टीवर असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.  डिसेंबर २०१३ मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  त्यांच्या निधनानंतर २८ मार्च २०१४ रोजी यंगिस्तान सिनेमा प्रदर्शित झाला होता. या राजकीय नाट्य असलेल्या चित्रपटात जॅकी भगनानी आणि नेहा शर्मा मुख्य भूमिकेत होते.

शम्मी कपूर – रॉकस्टार
काश्मीर की कली, तीसरी मंजिल अशा अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये दिसणारे ज्येष्ठ अभिनेते शम्मी कपूर यांचे १४ ऑगस्ट २०११ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांनंतर, ११ नोव्हेंबर रोजी त्यांचा रॉकस्टार हा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये त्याचा मोठा नातू रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट जबरदस्त हिट ठरला होता.

अमरीश पुरी – कच्ची सडक
मिस्टर इंडियासह अनेक चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार्‍या अमरीश पुरी यांचे १२ जानेवारी २००५ रोजी ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले. अखेरच्या वेळी अमरीश पुरी यांनी किसना आणि कच्ची सडक या दोन चित्रपटांत काम केलं होतं. ज्यापैकी किसना हा चित्रपट त्यांच्या उपचारादरम्यान प्रदर्शित झाला होता, तर कच्ची सडक त्यांच्या निधनानंतर ८ सप्टेंबर २००६ रोजी प्रदर्शित झाला होता.

हे देखील वाचा