Tuesday, March 3, 2026
Home बॉलीवूड सुशांत सिंग राजपूतच्या जवळच्या सदस्याचे झाले निधन, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बहिणीची माहिती

सुशांत सिंग राजपूतच्या जवळच्या सदस्याचे झाले निधन, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बहिणीची माहिती

टेलिव्हिजन आणि बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेता अशी ओळख मिळवणारा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आजही लोकांच्या समरणात कायम आहे. आजही त्याला त्याच्या चित्रपटांना आठवले जाते. जवळपास अडीच वर्ष झाले त्याचे निधन होऊन तरीही अजून त्याचे फॅन्स त्याला विसरलेले नाही. आता यातच सुशांत सिंग राजपूतचा अतिशय जवळचा आणि प्रिय पेट असलेल्या ‘फज’ या कुत्र्याचे निधन झाले आहे. सुशांतची बहीण असलेल्या प्रियंकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दल सर्वांना माहिती दिली आहे.

सुशांतची बहीण असलेल्या प्रियंकाने सोशल मीडियावर ‘फज’चे काही फोटो शेअर करत सर्वांना ही दुःखद बातमी दिली आहे. प्रियंकाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये एका फोटोत सुशांतने फजला प्रेमाने पकडलेले दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये प्रियांका फजसोबत दिसत आहे. हे फोटो शेअर करताना प्रियंकाने कॅप्शनमध्ये लिहिले, “खूपच लांबची सोबत होती फजची आम्हाला, त्या तुझ्या मित्राजवळ स्वर्गात निघून गेला, सर्वांनाच एक ना एक दिवस जायचे आहे. मात्र आता खूप जास्त माझे मन उदास आहे.” तत्पूर्वी प्रियांकाच्या या पोस्टवर सुशांतच्या फॅन्सने कमेंट्स करत फजच्या निधनामुळे त्यांना किती त्रास होत आहे हे सांगितले आहे.

तत्पूर्वी सुशांत आणि फज यांचे नाते खूपच अनोखे होते. अनेकदा सुशांत फजसोबत खेळताना मस्ती करताना दिसायचा. त्याने त्याचे फजसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. सुशांत गेल्यानंतर देखील फज खूप उदास झाला होता. त्याचे तेव्हा देखील व्हिडिओ व्हायरल झाले होते. सुशांतचे फाजूवर जीवापाड प्रेम होते. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी फजसाठी एक भावनिक नोट देखील लिहिली होती. त्याने यात लिहिले होते की, “जर तू मला लक्षात ठेवले तर मला कोणाचीही पर्वाच नाही की ते मला विसरले. माझे प्रेम फज.” सुशांतने १४ जून २०२० रोजी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला होता. त्याची हत्या झाली की आत्महत्या याबाबत अजूनही केस सुरु आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘आपल्या मुलांना मोठे होताना पाहणे…’ रवीना टंडनने लिहिली मुलगी राशासाठी खास पोस्ट

चार दिन की चांदनी! गौतमी पाटीलवर मेघा घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘सगळ्या मर्यादा…’

हे देखील वाचा