माजी मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुश्मिता सेनेला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा धक्का आला होता. याची माहिती तिने स्वतः सोशल मीडियावर दिली होती. तिच्यावर एंजियोप्लास्टी देशील करण्यात आली होती. आता तिच्या तब्येतीत उत्तम सुधारणा असून, ती आता बरी होत आहे. आता सुश्मिताने डॉक्टरांचा सल्ला घेऊन योगा करणे सुरु केले आहे.
सुश्मिता सेनने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा लेटेस्ट फोटो पोस्ट केला, ज्यात ती योगाच्या ड्रेसमध्ये खुल्या जागेत स्ट्रेचिंग करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना सुश्मिताने कॅप्शनमध्ये लिहिले, “व्हील ऑफ लाइफ. माझ्या कार्डियोलॉजिस्टने मला परवानगी दिली आहे. स्ट्रेचिंग सुरु केले आहे. खूपच छान भावना आहे. ही माझी हॅप्पी होळी आहे. तुमची कशी आहे? सर्वांना खूप प्रेम…”
View this post on Instagram
सुश्मिता सेनने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर करत तिला हार्टअटॅक आल्याचे सांगितले होते. तिने एक फोटो शेअर केला होता, ज्यात ती तिच्या वडिलांसोबत दिसत होती. याला कॅप्शन देताना तिने लिहिले की, “माझ्या वडिलांचे शब्द- आपल्या हृदयाला नेहमीच आनंदी आणि शक्तिशाली ठेवा. हे आपल्याला तेव्हा साथ देईल जेव्हा तुम्हाला तुमच्या हृदयाची सर्वात जास्त गरज आहे. काही दिवसांपूर्वी मला हृदयविकाराचा झटका आला. अँजिओप्लास्टीही झाली. आता ठिक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या हृदयरोग तज्ज्ञांनी माझं हृदय मोठं आहे याची मला खात्री पटवून दिली.”
सुश्मिताच्या या पोस्टनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. तिच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ती काही दिवसांपूर्वीच ‘आर्या २’ सिरीजमध्ये दिसली होती. ज्यात तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. आता लोकांना या सिरीजच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे. याशिवाय ती ‘ताली’ मध्ये दिसणार आहे. हा सिनेमा किन्नर गौरी सावंत यांची बायोपिक आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
– Womens Day Special: आधुनिक विचाराच्या क्षेत्रात राहूनही ‘या’ अभिनेत्री ठरल्या घरगुती हिंसाचाराच्या बळी