Monday, July 8, 2024

‘यालाच तर खरा टॅलेंट म्हणतात!’ घनदाट झाडी, समोर स्विमिंग पूल अन् रिमझिम पावसात थिरकली सुष्मिता

साल १९९४ ची ‘मिस इंडिया युनिव्हर्स’ सुष्मिता सेनने आपल्या अभिनयाच्या आणि शायऱ्यांच्या जोरावर अनेक रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. अभिनेत्री सध्या चित्रपटांमध्ये फारशी झळकत नाही. पण ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दररोज आपल्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी व्हिडिओ आणि फोटो शेअर करते. तिच्या सर्व पोस्टवर चाहते खूप मोठ्या प्रमाणावर लाईक्सचा वर्षाव करतात. अशात सध्या तिचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे.

सुष्मिताने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती शिव शंकराच्या गाण्यावर ताल धरताना दिसत आहे. तिने यामध्ये पांढऱ्या रंगाचा अनारकली ड्रेस घातला आहे. तसेच केस मोकळे सोडून, ती एका स्विमिंग पूल जवळ असल्याचे दिसत आहे. तिच्या आजूबाजूचे निसर्गरम्य वातावरण मनाला शांत करणारे आहे. सर्वत्र घनदाट झाडी, पुढे स्विमिंग पूल आणि पावसाची रिमझिम या सर्व वातावरणात अभिनेत्रीचा डान्स. या सगळ्यामुळे तिचे चाहते पुरते भारावून गेले आहेत.

तिच्या या लूकवर आणि डान्सवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. यावर एकाने कमेंट करत लिहिले आहे की, “हेच खरे टॅलेंट आहे.”, तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे की, “मॅम तुम्ही अतिशय सुंदर आहात. तुम्ही खूप गोड आहात.” तसेच आणखी एकाने लिहिले आहे की, “मॅम, तुमच्यासारखं कोणीच नाही.” यासह तिचे अनेक चाहते तिच्या व्हिडिओवर हार्ट इमोजीचा वर्षाव करत आहेत. तिचा हा व्हिडिओ १ मिनिट ४४ सेकंदाचा आहे.

सुष्मिताच्या अभिनयाविषयी बोलायचे झाले, तर तिने ‘आर्या’ या वेब सिरीजमधून ओटीटीमध्ये पदार्पण केले होते. सध्या ती या वेब सीरिजच्या दुसऱ्या पर्वासाठी शूटिंग करत आहे. तिच्या ‘आर्या’ वेब सिरीजला देखील चाहत्यांनी खूप प्रेम दिले. तिच्या कलेच्या जोरावर ती अनेक पुरस्कारांची मानकरी देखील ठरली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोणी म्हणतंय ‘रावणाचा ड्रेस’, तर कोणी ‘पक्षीराज’; विचित्र आउटफिटमुळे ट्रोल झाली उर्वशी

-राज कुंद्राच्या सुटकेनंतर गहना वशिष्ठने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘तू खूप…’

-‘तो केवळ तरुण अभिनेत्रींसोबतच काम करतो’, सलमानसोबत पुन्हा काम करण्याच्या प्रश्नावर भाग्यश्रीने दिले उत्तर

हे देखील वाचा