Friday, June 13, 2025
Home बॉलीवूड ‘सगळं ठीक तर आहे ना?’ म्हणत सुष्मिताच्या भावनिक पोस्टवर चाहत्यांची प्रतिक्रिया

‘सगळं ठीक तर आहे ना?’ म्हणत सुष्मिताच्या भावनिक पोस्टवर चाहत्यांची प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन त्या अभिनेत्रींपैकी आहे, ज्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा करायला आवडत नाही. पण आजकाल सुष्मिता सोशल मीडियावर तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दिसत आहे. तिने काही दिवसांपूर्वी एक भावनिक पोस्ट केली होती, त्यामुळे ती खूपच चर्चेत आहे. ही पोस्ट तिने तेव्हा शेअर केली होती, जेव्हा तिच्या आणि तिच्या बॉयफ्रेंड रोहमन शाॅल याच्या ब्रेकअपची चर्चा सर्वत्र पसरली होती. तिची ही पोस्ट वाचून तिचे चाहतेही हैराण झाले आहेत.

सुष्मिता सेनने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिलेला एक मेसेज शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने व्हिएन्ना फारोन यांचा कोट लिहिला आहे.

तिने लिहिले आहे की, “आयुष्यात काही तरी असं होतं की, आपण आयुष्याशी दोन हात करू शकत नाही. आपण नेहमी त्या नात्यांकडे आकर्षित होतो, ज्यांच्यामुळे आपल्याला फक्त त्रास होतो किंवा काही अशी नाती जे या सगळ्या गोष्टीपासून लांब असतात. आपलं काम असतं की, आपण स्वतः ला जागरूक ठेवलं पाहिजे आणि परिस्थितीशी दोन हात करता आले पाहिजेत. यामुळे आपण नेहमीच स्वत: ला आणि दुसऱ्याला मिळवण्याच्या मार्गावर असतो.”

सुष्मिताच्या या पोस्टवर प्रेक्षकांकडून खूपच प्रतिक्रिया येत आहे. काही जण तिचे कौतुक करत आहेत, तर काहीजण तिला विचारत आहेत की, ‘सगळं काही ठीक आहे ना?’ अशातच स्पॉटबॉयच्या माहितीनुसार, ही पोस्ट तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाले अशी अफवा‌ पसरली होती त्यादरम्यान केली होती. परंतु त्या दोघांनीही याबाबत कोणतेही वक्तव्य केले नव्हते.

सुष्मिताबद्दल बोलायचं झालं, तर तिने सन १९९४ साली मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. तिने आपल्या अभिनयाने अनेक चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. तिने सन १९९६ साली ‘दस्तक’ चित्रपटातून अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती. तिने काम केलेल्या चित्रपटांमध्ये ‘मैं हू ना’, ‘बिवी नंबर १’, ‘सिर्फ तूम’, ‘नो प्रॉब्लेम’, ‘चिंगारी’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तिचा अंदाजच निराळा! अभिनेत्री मलायका अरोराने भिंतीवर ‘हा’ योगा करून वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

-मोठी बातमी! ड्रग्ज प्रकरणात अभिनेता एजाज खानला एनसीबीने मुंबई विमानतळावर घेतले ताब्यात, ‘या’ टोळीशी संबंध असल्याची शक्यता

-“फोनवर तिचा आवाज ऐकला की हृदय तुटतं” म्हणत सतीश कौशिक झाले आजारी मुलीच्या आठवणीत भावुक

हे देखील वाचा