बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) सध्या त्याच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी ऋतिक एका मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट झाला होता. त्यानंतर उघड झाले की, ऋतिकची ही मिस्ट्री गर्ल दुसरी कोणी नसून, बॉलिवूड अभिनेत्री सबा आझाद (Saba Azad) आहे. त्या दिवसापासून असा दावा केला जात आहे की, ऋतिक आणि सबा आझाद एकमेकांना डेट करत आहेत. कारण यावेळी ऋतिक आणि सबा एकमेकांचा हात धरताना दिसले. या सर्व बातम्यांदरम्यान आता ऋतिकची एक्स पत्नी सुजैन खानने (Sussanne Khan) सबा आझादचे जोरदार कौतुक केले आहे.
सबा आझाद अभिनेत्रीसोबतच गायिकाही आहे. सुजैन खानने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर सबाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. सुजैनने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सबाचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये सबा आझाद स्टेजवर उभे राहून गाताना दिसत आहे. या दरम्यान ती या वातावरणाचा पुरेपूर आनंद घेत आहे. सुजैन खानने या फोटोसोबत लिहिले की, “किती छान संध्याकाळ होती. तू सुपर कूल आणि सुपर टॅलेंटेड आहेस सबा आझाद.”
सुजैन खानकडून मिळालेल्या कौतुकावर सबा आझाद देखील खूप खूश आहे. यासाठी सबाने सुजैन खानची इंस्टाग्राम स्टोरी पुन्हा शेअर केली आहे. यासोबत सबा आझादने लिहिले की, “धन्यवाद माझी सुजी. काल रात्री तू तिथे होतीस त्यामुळे मी खूप आनंदी आहे.” सबा खान आणि ऋतिक रोशन एकमेकांना डेट करत आहेत की, नाही. या गोष्टीची अद्याप पुष्टी झालेली नाही. पण सुजैन खानने सबाची प्रशंसा करून हे सिद्ध केले आहे की, तिचे आणि सबा आझादचे चांगले नाते आहे. दोघींमध्ये कोणतीही अडचण नाही.
सबा आझादला काही काळापूर्वी ऋतिक रोशनसोबतच्या नात्याबद्दल विचारण्यात आले होते. मात्र अभिनेत्रीने या प्रश्नाचे उत्तरही दिले नाही. सबाने हा प्रश्न टाळला होता. त्यामुळेच चाहते त्यांच्या नात्याची बातमी खरी मानत आहेत. सबा आणि ऋतिक एकाच प्रोजेक्टवर काम करत असल्याचा दावा केला जात आहे.
हेही वाचा –
- ‘रंग प्रेमाचा,’ म्हणत सोनाली कुलकर्णीने ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त केले खास फोटो शेअर
- ईशा गुप्ताने इंस्टा स्टोरीला लिहिले असे काही की, चाहतेही पडले विचारात
- जीवाची पर्वा न करता सुनील दत्त यांनी नर्गिस यांच्यासाठी मारली होती आगीत उडी, अशी सुरु झाली ही प्रेमकहाणी
हेही पाहा-