Saturday, June 29, 2024

ऋतिक रोशन- सबा आजादच्या कथित प्रेमप्रकरणानंतर, आता ‘या’ व्यक्तीसोबत फिरताना दिसली सुजैन खान

अभिनेता ऋतिक रोशन (Hritik Roshan) आणि सबा आजाद (Saba Azad) यांच्या प्रेमप्रकरणाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. दोघेही अनेकदा एकत्र फिरताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. इतकेच नव्हे, तर सबा सध्या ऋतिक रोशनच्या कुटूंबासोबतही अनेकदा दिसत आहे. त्यामुळे दोघेही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तत्पुर्वी ऋतिक रोशनची पत्नी सुजेन खानही (Sussanne Khan) एका व्यक्तीसोबत फिरतानाचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्याची आता सगळीकडे चर्चा रंगली आहे.

याबाबत संपुर्ण माहिती अशी की, सध्या सोशल मीडियावर सुजेन खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती एका व्यक्तीसोबत फिरताना दिसत आहे. या आधीही ती अनेकदा या व्यक्तीसोबत फिरताना दिसली असून, अर्सलान गोनी असे या व्यक्तीचे नाव आहे. अर्सलान गोनी आणि सुजेन खान नेहमीच सोशल मीडियावर एकमेकांसोबत फिरताना दिसत असतात. इतकेच नव्हे, तर ते अनेकदा वेगवेगळ्या पार्टीत एकत्र दिसत असतात. सध्या या व्हायरल व्हिडिओत काळ्या रंगाचा टॉप आणि ब्लेजरमध्ये सुजैन खूपच सुंदर दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

दरम्यान सबा आजाद आणि सुजेन खान यांच्या मैत्रीचीही नेहमी चर्चा होत असते. दोघीही सोशल मीडियावर त्यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना दिसत असतात. सुजैन आणि सबामध्ये इतकी घट्ट मैत्री आहे की, दोघी एकमेकींना खास टोपणनावाने हाक मारतात. त्यामुळेच दोघींमध्ये घट्ट मैत्री असल्याचे दिसते. अभिनेता ऋतिक रोशन आणि सुजैनने २००० साली लग्न केले होते. मात्र त्यांचे हे नाते फार काळ टिकू शकले नाही. त्यामुळेच दोघांनी २०१४ मध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. आता अभिनेता ऋतिक रोशन आणि सबा आजाद यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा