Tuesday, July 9, 2024

‘पुणेकर म्हणजे फार मोठ्ठे कलाकार!’, म्हणत सुव्रत जोशीने पुणेकर अन् ‘या’ गोष्टीचे नाते केले उघड

पुणे शहर म्हणजे पुणेकरणांचा जीव की प्राण! पुण्यात आलं की तापमान कमी आणि अपमानच जास्त होतो, असे गंमतीमध्ये म्हटले जाते. कारण पुणेकरांची शैलीच निराळी आहे. आपल्या शहराबद्दल ते किंचितही वाईट ऐकू शकत नाहीत. शिवाय दरवेळी पुण्याचं गुणगान गात असतात. सर्व सामान्यांप्रमाणे कधी कधी मराठमोळे कलाकारही पुण्याची स्तुती करताना किंवा या शहराबद्दल काहीतरी बोलताना दिसत असतात. अशातच आता सुव्रत जोशीची पुण्यासंबंधीची पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

सुव्रत जोशी सोशल मीडियावर खूप सक्रिय राहतो. दरदिवशी वेगवेगळ्या विषयांसह तो चाहत्यांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. चाहतेही त्याच्या पोस्टला भरभरून प्रतिसाद देत असतात. नुकत्याच त्याने शेअर केलेल्या पोस्टलाही चाहते खूप प्रेम देत आहेत. (suvrat joshi describing relation between punekar and thier two wheeler)

सुव्रतने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो आणि त्याची स्कुटर दिसत आहे. विशेष म्हणजे, या पोस्टद्वारे अभिनेत्याने पुणेकर आणि टू व्हीलरचं नातं सर्वांसमोर मांडलं आहे.

या पोस्टमध्ये सुव्रत म्हणतोय की, “एखादा पुणेकर आणि टू व्हीलर यांचे नाते, काऊ बॉय आणि घोडे, अरब आणि उंट,denerys आणि dragon या परंपरेमधले आहे. माझ्या मते पुण्यातील दुचाकी वाहनांना मने असतात. अन्यथा पुण्यातील गल्लोगल्ली स्वतःला Fast and Furious मधले Vin “Diesel” समजणारे, “पेट्रोल” भरून आपापली वाहने Stuntman च्या आवेशात उधळतात तेव्हा काहीतरी दैवी शक्ती त्यांच्या पाठीशी असल्याची प्रचिती येते,ती आली नसती. कारण चालक आणि वाहन यापैकी किमान एकाकडे डोकं आणि मन असल्याशिवाय पुण्याच्या रस्त्यावर हा अव्याहत सावळा गोंधळ चालू राहणे अशक्य आहे. बहुतेक चालकांकडे ते जशी गाडी चालवतात ते पाहून ते एका वेळी डोके किंवा गाडी यापैकी एकच गोष्ट चालवू शकत असतील अशी दाट शंका येते.

पुढे अभिनेता लिहतो की, “खरंतर पुणेकर हे फार मोठे कलाकार आहेत असेच म्हटले पाहिजे. कुठल्याही सिग्नल ला समोर खांबावर असलेल्या लाल, पिवळ्या आणि हिरव्या या साध्याशा रंगांचे प्रत्येक जण दरवेळी किती वेगवेगळे अर्थ लावत जातो. त्यामुळे कधी लाल रंग पाहून जोरात पुढे जाणे,पिवळा पाहून यू टर्न,हिरवा पाहताच फूट पाथवरून गाडी पुढे घालणं असे नवनवे सृजन निर्माण करणे त्यांना शक्य होते. रस्ता हा एखादा कोरा कॅनव्हास आहे आणि एकाच वेळी स्वच्छंद मनोवृत्तीचे अनेक अमुर्त चित्रकार त्यांच्या दुचाकिरुपी ब्रशने मनसोक्त फटकारे मारत आहेत असेच (अमूर्त) चित्र चौकाचौकात दिसून येते. किती छान!”

असे म्हणत त्याने चाहत्यांना पुढील भाग कमेंट सेक्शनमध्ये पूर्ण करायला सांगितला आहे. चाहतेही यावर अनेक गंमतीदार प्रतिक्रिया देत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सर्वांना पोट धरून हसवणाऱ्या कपिलने एकेकाळी केलंय टेलिफोन बुथवर काम, वाचा त्याच्या संघर्षाची कहाणी

-‘तिचं नाव सुद्धा आठवत नाहीये…’, रणवीर सिंगच्या गर्लफ्रेंडबद्दलच्या ‘या’ प्रश्नावर सलमान खानचं तडकीफड उत्तर

-यामी गौतमचा मोठा खुलासा, किशोरवयीन काळापासून ‘या’ आजाराने आहे अभिनेत्री ग्रस्त

हे देखील वाचा