Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

आनंदाची बातमी! सुयश अन् आयुषीच्या हळदी समारंभाचे फोटो व्हायरल, दिसतायेत एकदम खुश

मागील अनेक दिवसापासून अभिनेता सुयश टिळक आणि आयुषी भावे यांचं केळवण चालू आहे. त्यामुळे या जोडप्याचे लग्न लवकरच होईल याची सगळ्यांना चाहूल लागली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करून ही बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली होती. या बातमीने सुयशचे चाहते खूपच खुश झाले होते. अशातच त्यांच्या हळदी समारंभाचे फोटो समोर आले आहेत.

सोशल मीडियावर सुयश आणि आयुषीचे हळदीचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये आयुषीने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. तसेच हातात हिरवा चुडा घातला आहे. तसेच सुयशने पांढरा कुर्ता घातला आहे. दोघांनाही हळद लागली आहे. ते दोघे एकमेकांना हळद लावताना दिसत आहेत. ते दोघेही या फोटोमध्ये खूपच खुश दिसत आहेत. तसेच आयुषीचा मेहेंदी काढलेला व्हिडिओ देखील समोर आला आहे.

सुयशने महाराष्ट्राची श्रावण क्वीन ठरलेल्या आयुषी भावेसोबत साखरपुडा झाला आहे. त्यांनी साऊथ इंडियन पद्धतीने साखरपुडा केला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या खास दिवशी आयुषीचा वाढदिवस होता. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होते. त्या दोघांनी साऊथ इंडियन पोशाख परिधान केला होता.

सुयश आणि आयुषीने त्यांच्या नात्याबाबत खूप गुप्तता पाळली होती. त्यांनी साखरपुडा करून त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.

याआधी सुयश ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अक्षया देवधरसोबत रिलेशनमध्ये होता. त्यांचे एकत्र फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, पण काही दिवसांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाल्याची बातमी समोर आली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘स्वीटू’ने केला ‘नलू मावशी’सोबत मस्ती करतानाचा व्हिडिओ शेअर, अभिनेत्री आदिती म्हणाली, ‘माझ्याकडून पण एक…’

-‘आमची गुळाची ढेप’, म्हणत प्राजक्ता माळीच्या गोड स्माईलचे आणि सौंदर्याचे होते तोंडभरून कौतुक

-आकाशी रंगाच्या साडीमध्ये ‘परमसुंदरी’ दिसणाऱ्या मिथिला पालकरचे फोटो पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

हे देखील वाचा