‘का रे दुरावा’ मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता सुयश टिळक आपणा सर्वांनाच माहिती आहे. यात त्याने ‘जय’ ही व्यक्तिरेखा साकारली होती, जी प्रचंड गाजली. केवळ मालिकेतच नव्हे, तर सुयशने बऱ्याच नाटकात आणि चित्रपटात अभिनय करून चाहत्यांची मने जिंकली आहेत. याशिवाय तो चाहत्यांमध्ये सतत त्याच्या पोस्टमुळे चर्चेत असतो.
नुकतंच सुयशने आयुशी भावेसह साखरपुडा करून सर्वांनाचा आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. त्यांच्या साखरपुड्याचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. नुकताच सुयशने त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे, जो देखील चाहत्यांमध्ये तूफान व्हायरल होत आहे.
या थ्रोबॅक फोटोमध्ये सुयश आणि त्याच्यासोबत आयुशी दिसत आहे. इतकेच नव्हे तर या दोघांव्यतिरिक्त या फोटोमध्ये त्याचा पाळीव कुत्रा देखील दिसत आहे. सुयश त्याच्या कुत्र्याच्या खूप जवळ आहे. अनेकदा तो त्याच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.
हा फोटो शेअर करत सुयश म्हणतोय की, “थ्रोबॅक फोटो…कारण मी खूप खुश आहे!’ यावरून सहज लक्षात येईल की, आपल्या जीवनाच्या नव्या पर्वाची सुरुवात करत असताना, सुयश खूप आनंदी आहे. चाहत्यांनी या फोटोवर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. (suyash tilak shared photo and said because i am very happy)
सुयशने साखरपुड्याचे फोटो शेअर केल्यानंतर आता चाहत्यांना त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा आहे. चाहते सतत त्याला सनई चौघडे कधी वाजणार याबाबत विचारत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अली गोनीकडे सध्या नाहीये कोणताच प्रोजेक्ट; वाढलेलं वजन आहे का यामागचं कारण??