Wednesday, July 2, 2025
Home मराठी मोठ्या अपघातातून बचावलेला सुयश टिळक म्हणतोय, तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनेमुळे वाचलो

मोठ्या अपघातातून बचावलेला सुयश टिळक म्हणतोय, तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनेमुळे वाचलो

मराठी टीव्ही सीरिअल्समधून घरा घरात पोहचलेला अभिनेता म्हणजे सुयश टिळक. आपल्या दमदार लूकने आणि जबरदस्त अभिनयाने सुयशने केवळ तरुणाईला नव्हे तर प्रत्येक वयोगटातील चाहत्याला त्याच्या दिवाण बनवले आहे. झी मराठीवरील ‘का रे दुरावा’ या लोकप्रिय सीरियलमधूनच सुयशची खरी ओळख निर्माण झाली. जय या सालस आणि सुसंस्कारी मुलाची भूमिका निभावून त्याने प्रत्येकालाच प्रत्येक स्वतः कडे आकर्षित केले होते.

हाती आलेल्या माहितीनुसार सुयशचा 28 फेब्रुवारीला अपघात झाला होता. सुयश एका कॅबने चालला होता. कॅबमध्ये केवळ सुयश आणि त्या कॅब चालक एवढेच होते. जात असताना एका माल वाहतुकीच्या गाडीची धडक सुयशच्या कॅबला लागली आणि त्या जोरदार धक्क्याने सुयशची कॅब रस्त्याच्या कडेला ढकलली गेली. एवढा मोठा अपघात झाला पण सुयश आणि त्या चालकाचे नशीब थोर महणायचे की त्यांना कोणत्याही प्रकारची गंभीर दुखापत झाली नाही. परंतु कॅबचे मात्र काही प्रमाणात नुकसान झाले.

सुयशच्या या अपघाताची बातमी खूपच कमी वेळात प्रेक्षकांपर्यंत पोहचली. त्याच्या चाहत्यांनी त्याच्या काळजीपोटी तब्बेतीची विचारपूस केली. तेव्हा सुयशने त्याच्या सोशल मीडियावरून सगळ्या प्रेक्षकांना तो सुखरूप असल्याची माहिती दिली आहे. तो म्हणला की, ” तुमच्या सगळ्यांनी माझ्यासाठी जी प्रार्थना केली, त्याबद्दल मी सगळ्यांचा खूप आभारी आहे. मी आता सुखरूप आहे, मला कोणत्याही प्रकारची गंभीर दुखापत झाली नाही. तुमच्या सगळ्यांच्या काळजीमुळे माझा माणुसकी वरचा विश्वास अजूनच अढळ झाला आहे.” या पोस्ट नंतर त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याला ‘स्वतःची काळजी घे’ असं संदेश दिला आहे.

हे देखील वाचा