Saturday, June 29, 2024

लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डेचे झाले अभिनय क्षेत्रात पदार्पण, ‘या’ चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या चित्रपटसृष्टीत अनेक स्टारकीड पदार्पण करत आहेत. त्यांच्या करिअरची नवी दिशा ठरवत आहेत. अशातच दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (laxmikant berde) आणि प्रिया बेर्डे (priya berde)यांची मुलगी स्वानंदी बेर्डेकर (swanandi berde) ही अभिनयात पदार्पण करत आहे. ती तिच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिचा रिस्पेक्ट हा चित्रपट लवकरच भेटीला आहे. तिने नाटकातून अभिनय करण्यास सुरवात केली. त्यानंतर तिने चित्रपट शूट केला.

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी देखील नाटकापासून करिअरला सुरुवात केली होती. त्यांनतर ते चित्रपटात उतरले. त्यानंतर त्याच्या अभिनयाच्या गाडीने जोरदार धाव घेतली. अशाच प्रकारे आता स्वानंदी देखील ट्रॅकवर आली आहे आणि ती देखील खूप यश प्राप्त करू शकते. स्वानंदी सोशल मीडियावर देखील मोठया प्रमाणात सक्रिय असते. तिच्या सगळ्या गोष्टींची माहिती ती सोशल मीडियावर देत असते. अशातच तिने तिच्या आगामी चित्रपटाची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. स्वानंदीचा आता आता एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे.

तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या रिस्पेक्ट चित्रपटाचा ट्रेलर शेअर करून एक कॅप्शन दिले आहे. तिने लिहिले आहे की, “5 वर्षांच्या अपेक्षेने, कठोर परिश्रमानंतर आणि माझ्या प्रियजनांच्या प्रचंड पाठिंब्यानंतर, माझा पहिला प्रकल्प अखेर येथे आला आहे. या कथेचे साक्षीदार होण्याची मी प्रतीक्षा करू शकत नाही. या चित्रपटाचे चित्रीकरण माझ्याकडे पूर्णपणे होते आणि या चित्रपटात सहभागी झालेल्या लोकांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही.”

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मुलाने म्हणेजच अभिनय बेर्डे देखील चित्रपट सृष्टीत कार्यरत आहे. त्याने ती सध्या काय करते या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा