Saturday, October 18, 2025
Home मराठी तेजस्विनी अन् स्वप्नीलने शेअर केले अत्यंत रोमँटिक फोटो; पाहायला मिळाली ‘समांतर २’ मधील बोल्ड केमिस्ट्रीची झलक

तेजस्विनी अन् स्वप्नीलने शेअर केले अत्यंत रोमँटिक फोटो; पाहायला मिळाली ‘समांतर २’ मधील बोल्ड केमिस्ट्रीची झलक

स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित यांच्या ‘समांतर’ या वेब सीरिजने चाहत्यांची मने जिंकली. सोबतच समीक्षकांची देखील वाहवा मिळवली. उत्तम स्टारकास्ट, रंजक वळणं सोबतच कलाकारांची केमिस्ट्री याने हा सीझन हिट ठरला. काही दिवसांपूर्वीच या सीरिजच्या दुसऱ्या भागाची म्हणजेच, ‘समांतर २’ ची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे प्रेक्षकही या नव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते.

विशेष म्हणजे, ‘समांतर’ मध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा बोल्ड अवतार पाहायला मिळाला, जो रसिकांच्या पसंतीस उतरला होता. आता या नव्या सीझनमध्ये देखील तेजस्विनी पंडित आणि स्वप्नील जोशीचे बोल्ड सीन दाखवण्यात येणार आहेत. याचीच एक झलक तेजस्विनी आणि स्वप्नीलने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

त्यांनी इंस्टाग्रामवर अतिशय रोमँटिक असे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की, दोघांची अत्यंत बोल्ड आणि रोमँटिक केमिस्ट्री या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहे. हे ब्लॅक ऍंड व्हाईट फोटो चाहत्यांमध्ये खूप पसंत केले जात आहेत. विशेष म्हणजे सई ताम्हणकर आणि स्वप्नील जोशीची देखील रंजक केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. यामुळेच चाहत्यांमधील उत्सुकता आता शिगेला पोहचलेली दिसत आहेत. (swapnil joshi and tejaswini pandit shared romantic photos from samantar 2)

रंजक कथानक असलेला ‘समांतर २’ उद्या रिलीझ करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सीझनचा ट्रेलर रिलीझ करण्यात आला होता. त्यालाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. यावरून आपण अंदाज लावू शकता की, चाहते या सीझनसाठी किती उत्सुक असतील. विशेष म्हणजे, हा सीझन काय नवे ट्विस्ट घेऊन येईल, हे पाहणे कमालीचे ठरेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दुःखद! अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; कलाकारांनी व्यक्त केला शोक

-‘मिनिमून’ साजरा केल्यानंतर, सोनाली कुलकर्णी त्याच उत्साहात पुन्हा कामावर झाली रुजू

-‘पप्पी दे पारूला’ फेम स्मिता गोंदकर समुद्राच्या सानिध्यात घालवतेय तिचा वेळ; बीचवरील फोटोंना नेटकऱ्यांची पसंती

हे देखील वाचा