मराठी चित्रपटसृष्टीत चॉकलेट बॉय अशी ज्याची ओळख आहे तो अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी. स्वप्नील जोशी हा नेहमीच त्याच्या स्टाईल आणि आनंदाने सोशल मीडियावर चर्चेत असतो. पण आता त्याची मुलगी त्याच्या या अभिनयाला आणि डान्सला लवकर ओव्हर टेक करेल अशी लक्षणं दिसू लागली आहेत. हो आपण बोलत आहोत स्वप्नील जोशीची मुलगी मायरा जोशीबद्दल. आजकाल स्टारकीड ट्रेंड खूप चालला आहे. अनेक कलाकारांची मुले ही सोशल मीडियावर लोकप्रिय होताना दिसत आहेत. अशातच स्वप्नील जोशीची मुलगी का बरं मागे राहील?
स्वप्नील जोशीने नुकताच त्याची मुलगी मायरा हिचा एक डान्स व्हिडिओ त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याची मुलगी मायरा ही ‘कोका कोला’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या गाण्यात ती क्रिती सेननसारखा डान्स करण्याचा प्रयत्न करत आहे. एवढ्या लहान मुलीला या डान्स स्टेप्स फॉलो करताना पाहून स्वप्नील जोशीचे चाहते हैराण झाले आहेत. ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मायराचे कौतुक करत आहेत.
तिच्या या व्हिडिओवर स्वप्नील जोशीचे अनेक चाहते तसेच कलाकार देखील कमेंटचा वर्षाव करत आहेत. यात अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने कमेंट केली आहे की, “अगं बाई किती गोड! खाऊ का मी तुला मायरा?” या सोबतच प्रार्थना बेहेरेने कमेंट केली आहे , “ओ सो क्यूट.” मायराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.
स्वप्नील जोशी हा मराठी चित्रपट सृष्टीतील एक आघाडीचा नायक आहे. त्याने अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. ‘मितवा’, ‘तू ही रे’, ‘दुनियादारी’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘लाल इश्क’, ‘भिकारी’, ‘फुगे’ तसेच ‘मुंबई पुणे मुंबई’ यांसारख्या चित्रपटात उत्तम भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…