बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. ती इंडस्ट्रीच्या त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जे सोशल मीडियावर नेहमीच त्यांची बेधडक मतं मांडत असतात. यामुळे अभिनेत्रीला अनेक वेळा ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. तिच्या डाव्या विचारसरणीमुळे ती सोशल मीडियावर अनेक गटांच्या निशाण्यावर राहिली आहे. काही काळापूर्वी, अभिनेत्रीच्या एका चित्रपटाच्या सीनमुळे सोशल मीडियावर खूप गोंधळ निर्माण झाला होता. इतकेच नव्हे, तर अनेकांनी यावर आक्षेपार्ह विधानं केली होती. आता अभिनेत्रीने तिच्या बाजूने या प्रकरणात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
स्वरा भास्करने दक्षिण पश्चिम जिल्ह्यातील वसंत कुंज पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केली आहे. ट्विटरवरील काही युजर्सने स्वराच्या जुन्या चित्रपटाच्या एका सीनवर आक्षेपार्ह वक्तव्य आणि कमेंट केल्या, ज्याची स्वरा भास्करने दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. दिल्ली पोलिसांनी आयटी कायदा आणि इतर कलमांखाली एफआयआर नोंदवून कारवाई सुरू केली आहे. आता पोलीस लवकरच या प्रकरणी ट्विटरकडून उत्तरे घेतील आणि कोणकोणत्या ट्विटर अकाऊंटवरून हे ट्वीट केले गेले, हे जाणून घेतील. (swara bhaskar bollywood actress fir delhi police twitter users abusive language)
आर्यन खान प्रकरणावर मांडले मत
आपल्या स्पष्ट मतासाठी प्रसिद्ध स्वरा भास्करने अलीकडेच आर्यन खान प्रकरणात आणि लखीमपूर खीरी प्रकरणातही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. स्वराने ट्वीट केले, “मंत्र्याचा मुलगा ज्याने जाणूनबुजून चार लोकांना ठार मारले (व्हिडिओमध्ये याचे पुरावे देखील आहेत), तो घरी विश्रांती घेत आहे. तर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अं’मली पदार्थांमुळे तुरुंगात आहे. याचा अर्थ असा की, नवीन भारतात, धूम्रपानापेक्षा निर्घृणपणे हत्या करणे अधिक स्वीकार्य आहे.
Ministers son who wilfully mowed 4 people to death (evidence caught on video) is chilling at his home, while @iamsrk ’s son #AryanKhan is in jail for smoking hash.
Apparently in #NewIndia brutal murder is more acceptable than smoking a joint! ???????? https://t.co/Pf5RSRPx5A— Swara Bhasker (@ReallySwara) October 8, 2021
‘या’ चित्रपटात झळकणार अभिनेत्री
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर स्वरा भास्कर अखेरची ‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटात दिसली होती. याशिवाय, तिचे काही चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित झाले आहेत. अभिनेत्री आता ‘शीर कोरमा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती शबाना आझमी आणि दिव्या दत्तासोबत काम करताना दिसणार आहे. चित्रपटाचे काम सध्या सुरू आहे. याशिवाय ती ‘जहां चार यार’ या चित्रपटाचा एक भाग आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण
सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे