Saturday, April 12, 2025
Home बॉलीवूड ‘कोणालाच बनायचं नव्हतं सलमान खानची बहीण’, बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल स्वरा भास्करचा खुलासा

‘कोणालाच बनायचं नव्हतं सलमान खानची बहीण’, बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल स्वरा भास्करचा खुलासा

अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. त्यावरून ती अनेक विषयावर आपले बिंनधास्त  मत मांडत असते. आपल्या विवादित वक्तव्यासाठी अनेकदा तिला नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. कधी कधी ती अशी काही विधाने करते, ज्यामुळे सगळीकडेच तिच्यावर टीका होताना दिसत असते. आता स्वराने आपल्या चित्रपट क्षेत्रातील भूमिकांबद्दल महत्वपुर्ण खुलासा केला आहे. काय म्हणाली आहे ती नेमकी, चला जाणून घेऊ. 

आपल्या विवादित वक्तव्यामुळे चर्चेत असणारी स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या कसदार अभिनयासाठी खूपच प्रसिद्ध आहे. तिच्या प्रत्येक भूमिका आव्हानात्मक आणि जिवंतपणा आणणाऱ्या असतात. म्हणूनच तिच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. आपल्या भूमिकेसाठी स्वरा नेहमीच प्रचंड मेहनत घेत असते. त्यामुळेच तिच्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत असतात. अलिकडेच एका मुलाखतीत बोलताना स्वराने आपल्या या भूमिकांबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

या मुलाखतीत बोलताना स्वरा म्हणते की, “मी माझ्या करिअरमध्ये अशा भूमिका स्वीकारल्या ज्यांना बाकी अभिनेत्रींनी करण्यास नकार दिला होता. मला नेहमीच या गोष्टीचे आश्चर्य वाटते की, याच भूमिकांनी मला चित्रपट जगतात नवी ओळख मिळवून दिली, ज्यांना इतर अभिनेत्रींनी नाकारले होते.” आपल्या ‘रांझणा’ चित्रपटातील  भूमिकेबद्दल सांगताना ती म्हणते की, “मला ही भूमिका ऐनवेळी मिळाली होती, कारण ही भूमिका करणाऱ्या कलाकाराने नकार दिला होता, ज्यामुळे  ही भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली.”  त्याचप्रमाणे सलमान खानच्या (Salaman Khan) ‘प्रेम रतन धन पायो’  चित्रपटाचाही किस्सा असाच काहीसा होता. यामध्येही सलमान खानच्या बहिणीची भूमिका साकारायला कोणीही तयार नव्हते, ज्यामुळे हा रोल तिला देण्यात आला, अशा खुलासा स्वराने केला.

स्वराच्या ‘निल बटे सन्नाटा’ या चित्रपटातील भूमिकेचेही सगळीकडे कौतुक झाले होते. या भूमिकेबद्दल बोलताना ती म्हणते की, “मी ही भूमिका करण्याचे ठरवले, तेव्हा मला सांगितले होते की ही भूमिका माझ्यासाठी योग्य नसेल. मात्र हा दावा सपशेल खोटा ठरला. कारण या भूमिकेने मला विशेष ओळख मिळवून दिली. मला ती भूमिका आधी कोणी स्वीकारली होती किंवा त्या चित्रपटाचे बजेट किती आहे, या गोष्टींनी काहीही फरक पडत नाही,” असे तिने यावेळी सांगितले. दरम्यान स्वराने ‘गुजारिश’ चित्रपटातील छोट्याशा भूमिकेने चित्रपट जगतात पाऊस ठेवले होते. यानंतर तिने ‘चिल्लर पार्टी’, ‘रांझणा’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘अनारकली ऑफ आरा’ अशा चित्रपटात काम केले आहे.

हेही वाचा –

हे देखील वाचा