Tuesday, June 3, 2025
Home मराठी स्वरा भास्करने ओढले कंगना रनौत वर ताशेरे, म्हणाली अभिनेत्री उत्तम पण माणूस म्हणून…

स्वरा भास्करने ओढले कंगना रनौत वर ताशेरे, म्हणाली अभिनेत्री उत्तम पण माणूस म्हणून…

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणानंतर अभिनेत्री कंगना रनौत ने ट्विटर वर विवादित विधानांची मालिका जी सुरू केली ती अजूनही कायम आहे. मग ते नेपोटीझम वरून बॉलिवूड वर निशाणा साधणं असो किंवा मग मुंबईची तुला पाकव्याप्त काश्मीर सोबत करणं असो. ती इथवरच थांबली नाही तर तिने अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना टार्गेट तर केलंच पण जेव्हा दिल्ली सीमेवर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर ती बरळली तेव्हा मात्र हद्दच झाली. तिच्या या विधानावर देशभरातून नेटकर्यांनी तिला ट्रोल केलं होतं.

बॉलिवूड एकीकडे शेतकऱ्यांना पाठींबा देत असताना कंगणाने मात्र तिचं वादग्रस्त विधानं करणं सुरूच ठेवलं. तिच्या या विधानांवर, अभिनेत्री स्वरा भास्कर, गायक अभिनेता दिलजीत दोसांझ, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आदींनी सडकून टीका केली.

नुकतीच अभिनेत्री स्वरा भास्कर हिने माध्यमांना एक मुलाखत दिली. या मुलाखतीत स्वरा ला कंगना संदर्भात काही प्रश्न विचारण्यात आले आणि या प्रश्नांवर उत्तर देताना तिने कंगनावर पुन्हा एकदा टीकेची झोड उठवली. माध्यमांकडून स्वराला विचारण्यात आलं, “की कंगना, ‘एक चांगला कलावंत एक उत्तम माणूस देखील असतो’ या विधानावर खरी उतरते का?” यावर स्वरा म्हणाली, “माझ्या मतानुसार कंगना एकमात्र अशी अभिनेत्री आहे जी या विधानाच्या विपरीत वागते. आमच्यात या आधीही शाब्दिक चकमकी झाल्या आहेत. परंतु मला वाटतं की आपण या विधानावर पुन्हा एकदा विचार करायला हवा की,’एक चांगला कलावंत खरंच एक उत्तम माणूसदेखील असतो.’ कारण हे गरजेचं नाहीये की एक चांगला कलावंत एक उत्तम माणूस असलाच पाहिजे वगैरे…

स्वरा या मुलाखतीमध्ये पुढे म्हणते, ” आपण बऱ्याचदा एखाद्या कलाकाराने सिनेमात सज्जन भूमिका साकारली की खऱ्या आयुष्यात देखील त्याला सज्जन समजण्याची चूक करतो. भूमिका उत्तम साकारली याचा अर्थ आहे तो नट टॅलेंटेड आहे. तो त्याच्या कामात उत्तम आहे. परंतु हे गरजेचं नाही की ती व्यक्ती खऱ्या आयुष्यात देखील उत्तम माणूस असेल.”

यापुढे स्वरा म्हणाली, “अभिनय करणे ही इतर दुसऱ्या कोणत्याही व्यवसायासारखीच आहे. डॉक्टरांप्रमाणे अभियंता किंवा शिक्षकही त्याच्या कार्यात खूप चांगले असले पाहिजेत. परंतु ते चांगले माणूस देखील असतातच अस नाही. कलाकारांच्या बाबतीतही अगदी तेच आहे. उदा., मी एका लेखकाची मोठी चाहती आहे. ते एक महान लेखक आहेत, परंतु ते मला आतापर्यंत भेटलेल्या व्यक्तींपैकी सर्वात वाईट व्यक्ती आहेत. आपण एक चांगले नर्तक, गायक, अभिनेता, लेखक होऊ शकता. परंतु आपण त्याच अनुषंगाने एक उत्तम माणूस देखील असालच असं नाही.

कंगनाने स्वरावर देखील याआधी वादग्रस्त विधानं केली आहेत. कंगना आधी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर याना सॉफ्ट पॉर्न स्टार म्हणाली होती तर स्वरा भास्कर आणि तापसी पन्नू यांना बी ग्रेड सिनेमाच्या अभिनेत्री म्हणून संबोधलं होतं. तिच्या या विधानांवरून नेटकाऱ्यांनी तिला चांगलंच फैलावर घेतलं होतं.

हे देखील वाचा