Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड ‘हे कठोर शासन नाही, अराजकता’ अतिक अहमदच्या हत्येनंतर स्वरा भास्करने साधला सरकारवर निशाणा

‘हे कठोर शासन नाही, अराजकता’ अतिक अहमदच्या हत्येनंतर स्वरा भास्करने साधला सरकारवर निशाणा

गुन्हेगारी जगातून राजकारणात आलेल्या माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे त्या दोघांची हत्या पोलिसांच्या ताब्यात असताना झाली. त्यानंतर सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर आता विरोधी पक्षांनी सरकारवर निशाणा साधला आहे. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने देखील सरकारवर निशाणा साधत या हत्येची निंदा केली आहे.

स्वरा भास्कर सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. ती सतत राजकारणात आणि इतर गोष्टींबद्दल तिची मतं मांडत असते. तिच्या या मतांमुळे ती अनेकदा ट्रोल देखील होते. आता देखील तिने अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येबद्दल सरकारला खडेबोल सुनावत ट्विट केले आहे.

स्वरा भास्करने तिच्या ट्विटमध्ये लिहिले, “अतिरिक्त न्यायालयीन हत्या किंवा चकमक ही काही आनंद व्यक्त करावा अशी बाब नाही. हे अराजकतेचे एक लक्षण आहे. राज्य ही नियमांच्या विरोधात जाऊन काम करत आहे. राज्यांची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे आणि त्याचे कारण ते गुन्हेगारांसारखे काम करत आहेत किंवा त्यांना सक्षम करीत आहेत, हे कठोर शासन नाही, ही अराजकता आहे.”

दरम्यान १५ एप्रिल २०२३ रोजी उत्तरप्रदेशच्या प्रयागराज मध्ये माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना मेडिकल तपासणीसाठी नेण्यात येत होते. सांगायचा येत आहे कि याच वेळेस हमलेखोर बनून आले होते. जेव्हा अतिक आणि अशरफ मीडियाशी बोलण्यासाठी थांबले तेव्हा त्यांना गोळी मरण्यात आली.

२००५ मधील उमेश पाल हत्येप्रकरणी अतिक अहमद आणि अशरफ दोघेही अटकेत आहेत. अतीकवर विविध प्रकारचे सुमारे १०० गुन्हे दाखल होते. अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांना उमेश पाल हत्या प्रकरणात पोलीस न्यायालयीन सुनावणीसाठी प्रयागराजला घेऊन आले होते. त्याच वेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

कपूरपासून ते खानपर्यंत, बॉलिवूडमध्ये ‘या’ शक्तीशाली कुटुंबांचा आहे चांगलाच धाक; पाहा यादी

पदार्पणातच फिल्मफेयरचा पुरस्कार जिंकणाऱ्या मिस युनिव्हर्स लारा दत्ताचे वैयक्तिक आयुष्य राहिले नेहमीच चर्चेत

हे देखील वाचा