Tuesday, June 3, 2025
Home बॉलीवूड थेट नरेंद्र मोदींना टॅग करत अभिनेत्री स्वरा भास्करने मोदी सरकारला ठरवले ‘अपयशी!’ पोस्ट होतेय तूफान व्हायरल

थेट नरेंद्र मोदींना टॅग करत अभिनेत्री स्वरा भास्करने मोदी सरकारला ठरवले ‘अपयशी!’ पोस्ट होतेय तूफान व्हायरल

देशात सध्या कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. दररोज कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढतच आहेत. रुग्णांना ऑक्सिजन आणि बेड उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. असे असूनही, या धोकादायक विषाणूमुळे बर्‍याच लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. दरम्यान, या वेळेत बॉलिवूड सेलेब्सही खूप सक्रिय दिसत आहेत. या जागतिक समस्येवर ते आपले मत व्यक्त करत आहेत, कारण भारतात कोरोनाने आपले पाय तेव्हा पसरले आहेत, जेव्हा संपूर्ण जगाने जवळजवळ यावर मात केली आहे.

नुकतेच, बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने कोरोनाच्या या परिस्थितीवर नियंत्रण ठेवू न शकल्यामुळे, मोदी सरकारवर टीका केली आहे. तिने आपल्या सोशल मीडिया हँडलवर, वेगळ्याच स्टाईलमधील एका गाण्याचा व्हिडिओ शेअर करत, सरकारला अपयशी म्हटले आहे.

स्वरा भास्करने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ ‘मिस्टर एक्स इन बॉम्बे’ या चित्रपटाच्या एका गाण्याचा आहे. ज्याचे बोल आहेत, ‘मेरे मेहबूब कयामत होगी, आज रुसवा तेरी गलियो में मोहब्बत होगी.’ हे गाणे शेअर करत स्वराने एक कॅप्शनही दिले आहे.

कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले की, “ज्यांना मोठ्या अभिमानाने आणि विश्वासाने आम्ही प्रचंड बहुमतासोबत दोनदा जिंकवले होते. त्यांच्या नावावर भारताच्या उद्ध्वस्त होत असलेल्या जनतेने दिलेला संदेश.” तिच्या या पोस्टवर सोशल मीडिया युजर्स भरभरून प्रतिसाद देत आहेत. कोणी तिच्या समर्थनार्थ कमेंट्स करत आहेत, तर कोणी तिला ट्रोलही करत आहे.

महत्त्वाचे म्हणजे, स्वरा भास्करच्या घरातील सदस्यांनाही कोरोनाने ग्रासले आहे. अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियाद्वारे सांगितले होते की, तिचे वडील आणि तिच्याशिवाय संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. तसेच, लॉकडाऊन दरम्यान, अभिनेत्री स्वयंपाक करताना, भांडी धुताना आणि घरातील इतर कामे करताना दिसली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खरंच! आयुष्यातील पहिली किस म्हणत रणबीर कपूरने घेतले होते माधुरी दीक्षितचे नाव, सांगितले कधी आणि कसे

-याला म्हणतात गाण्याची जादू! हिमेश रेशमियाच्या ‘या’ गाण्यामुळे सापडला होता खरा चोर, दोन रात्रीत उडवले होते एक लाख रुपये

-प्रियांका चोप्राला या अवतारात पाहून चाहते झाले हैराण, फोटो झाला सोशल मीडियावर व्हायरल

हे देखील वाचा