बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही इंडस्ट्रीमधील एक प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळखली जाती. वेगवेगळ्या आणि वाखण्याजोग्या भूमिका साकारून स्वरा भलामोठा चाहतावर्ग कमावला आहे. शिवाय अभिनेत्री आपल्या निर्भीड मतांसाठीही ओळखली जाते. तिला समाजातील अनेक मुद्द्यांवर अगदी बिनधास्तपणे बोलताना पाहिलं गेलं आहे. यामुळे अभिनेत्रीला अनेक वेळा ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे.
अलीकडेच अभिनेत्रीने काही ट्विटर युजर्सच्या विरोधात आक्षेपार्ह कमेंट्स केल्यामुळे तक्रार दाखल केली होती. तर आता अभिनेत्रीने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि यूट्यूबरच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. स्वराने दिल्लीतील वसंत कुंज येथे यूट्यूबर एल्विश यादव विरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीमध्ये स्वराने यूट्यूबरवर तिच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात आपले म्हणणे नोंदवण्यासाठी, अभिनेत्री सोमवारी पटियाला हाऊस कोर्टात पोहोचली होती. (swara bhasker files complaint against youtuber elvish yadav over objectionable comment on her)
स्वरा भास्करच्या म्हणण्यानुसार, यूट्यूबरने केवळ तिच्या ‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाचा सीन घेऊन तिची प्रतिमा खराब करण्याचाच प्रयत्न केला नाही, तर सोशल मीडियावर तिच्या विरोधात आक्षेपार्ह हॅशटॅग देखील ट्रेंड केले जात आहेत. ज्यामुळे तिची प्रतिष्ठा खराब झाली आहे आणि या सगळ्यामुळे ती मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे.
एफआयआरमध्ये स्वरा भास्करने आयटी कायद्याच्या कलम -३५४ डी (पाठलाग मारणे), आयपीसी कलम -५०९ आणि कलम ६७ (इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे अश्लील कंटेंट पसरवणे) अंतर्गत यूट्यूबरवर आरोप केले आहेत.
तक्रारीनंतर यूट्यूबरनेही एक पोस्ट शेअर केली, ज्याद्वारे त्याने स्वरा भास्करला उत्तर दिले. या पोस्टमध्ये तो स्वरा भास्करने त्याच्यावर खोटे आरोप लावल्याबद्दल बोलला. यामध्ये ‘वीरे दी वेडिंग’चा एक सीन होता, ज्यात आक्षेपार्ह भाषा वापरली गेली होती.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण
सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे