Sunday, October 26, 2025
Home बॉलीवूड ‘त्या व्यक्तीला जिवंत जाळले गेले, तेव्हा तर…’, उदयपूर हत्याकांडावर स्वरा भास्करने केले मोठे वक्तव्य

‘त्या व्यक्तीला जिवंत जाळले गेले, तेव्हा तर…’, उदयपूर हत्याकांडावर स्वरा भास्करने केले मोठे वक्तव्य

काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका शिंप्याची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. उदयपूर हत्याकांडावरून सोशल मीडियावर चांगलाच गदारोळ निर्माण झाला आहे. एवढेच नाही, तर या प्रकरणावर चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या प्रतिक्रियांची प्रक्रियाही सातत्याने वाढत आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) हिनेही उदयपूर हत्याकांडावर नुकतेच प्रतिक्रिया दिली आहे.

खरं तर उदयपूर हत्याकांडातील दोन्ही दोषींविरोधात अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हे लक्षात घेत, अभिनेत्री स्वरा भास्करने नुकतेच तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये स्वराने २०१७ मध्ये एका व्यक्तीला जिवंत जाळणाऱ्या गुन्हेगाराचा उल्लेख केला आहे. स्वरा भास्करने लिहिले आहे की, “शंभूलाल रेगर याने २०१७ मध्ये राजस्थानमधील राजसमंद येथील एका मुस्लिम व्यक्तीला जिवंत जाळले होते. त्या घटनेनंतर आपण तितकेच घाबरलो होतो का जितके आज घाबरलोत? तेव्हा त्या आरोपीला दहशतवादी म्हटले होते का? उलट त्या गुन्हेगाराला जोधपूर कोर्टाने हार घालून नंतर २०१९ ची लोकसभा निवडणूकही लढवली होती.” (swara bhasker furious on call terrorist to udaipur murder case accused)

नेटकऱ्यांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया
स्वरा भास्करच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर नेटकरी प्रतिक्रिया देऊ लागले आहे. ज्या अंतर्गत एका ट्विटर यूजरने ट्विट केले आहे की, “तुम्ही एका गुन्ह्याची दुसऱ्या गुन्ह्यासोबत तुलना करत आहात. ज्याद्वारे तुम्ही गुन्हा न्यायप्रविष्ट करण्याचा प्रयत्न करत आहात.” दुसर्‍या युजरने स्वराला प्रश्न विचारला की, “२०१७ मध्येच तुम्ही या मुद्द्यावर आवाज का उठवला नाही असे म्हटले आहे.” तसेच स्वरा भास्करचे हे ट्वीट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हे देखील वाचा