Friday, July 5, 2024

लग्नाच्या प्री फंक्शन्समध्ये साऊथ इंडियन लूकमध्ये दिसली अभिनेत्री स्वरा भास्कर, फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या तिच्या लग्नामुळे चांगलीच गाजत आहे. ती पुन्हा एकदा वधू बनणार असून, त्याच्या तयारीत ती सध्या आहे. फ़ेब्रुवारी २०२३ रोजी तिने कोर्ट मॅरेज केल्याचे जाहीर केले आणि तिच्या फॅन्सला सुखद धक्काच बसला. आता ती बॉलिवूड स्टाइल लग्न करत आहे. स्वराने समाजवादी पार्टीचा नेता असलेल्या फहद अहमदची तिचा जीवनसाथी म्हणून निवड केली आहे. आता तिच्या लग्नाच्या आधीच्या सर्व कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकतेच तिने हळदीचे आणि तिच्या मेहेंदीचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

स्वरा भास्करने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीमध्ये हे सर्व फोटो शेअर केले आहेत. यात तिने मरून आणि गोल्डन रंगाची साडी नेसलेली आहे. ज्यात ती खूपच सुंदर दिसत होती. यात तिच्या हातावर मेहेंदी, लाल बांगड्या, नाकात नथ, माथा पट्टी आणि केसांमध्ये गजरा घातलेला दिसत आहे. काही फोटोंमध्ये ती तिच्या नवऱ्यासोबत फहद अहमदसोबत दिसत आहे. दोघांच्याही चेहऱ्यावर मोठा आनंद दिसत असून, स्वरा तिचे लग्न दिल्लीत जवळच्या लोकांच्या उपस्थितीत आजीच्या फार्महाउस वर करत आहे.

दरम्यान या लग्नामध्ये कर्नाटक संगीताचा देखील दिमाखदार कार्यक्रम झाला. तर १५ मार्च रोजी एका कव्वाली कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांना अतिशय जवळच्या नातेवाइकांना आणि मित्रांनाच आमंत्रण देण्यात आले आहे. १६ मार्च रोजी ग्रँड रिसेप्शनचे देखील आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान या दोघांनी फेब्रुवारीमध्ये कोर्ट मॅरेज केले असल्याचे जाहीर केले. त्यांनी जानेवारी ६ लाच कोर्ट मॅरेज केले आहे. तब्बल ४० दिवसांनी त्यांनी लग्न केल्याचा खुलासा केला.

प्राप्त माहितीनुसार या दोघांची भेट २०१९-२०२० साली झालेल्या एका आंदोलनादरम्यान झाली. स्वरा जोरजोरात विद्यार्थ्यंमध्ये घोषणा देत होती. इथेच दोघांची भेट विचार जुळले आणि त्यांची मैत्री झाली. फहदच्या प्रोग्रेसिव व्यक्तिमत्वाने स्वरा चांगलीच इम्प्रेस झाली. मार्च २०२० फहदने स्वराला त्याच्या बहिणीच्या लग्नाला बोलवते मात्र ती शूटिंगमध्ये व्यस्त होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘झूठा’ गाण्याच्या प्रदर्शनावेळी जोरजोरात रडली राखी सावंत म्हणाली, ‘मी संसाराची स्वप्न नाही पाहू शकत का?’

जय हो..! कोट्यवधी भारतीयांना गुडन्यूज, आरआरआर चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला मिळाला मानाचा ऑस्कर पुरस्कार

हे देखील वाचा