Monday, July 8, 2024

‘प्रेमाची भाषा सगळीकडे एकच’ म्हणत स्वरा भास्करने शेअर केले तिच्या हळदीचे सुंदर फोटो

अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या तिच्या लग्नामुळे चांगलीच गाजत आहे. स्वरा लवकरच सामाजिक कार्यकर्ता असणाऱ्या फहद अहमदसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. २०२३ सालातल्या जानेवारी महिन्यात त्यांनी कोर्ट मॅरेज केल्याचे फेब्रुवारीमध्ये जाहीर केले आणि सगळ्यांना एक सुखद धक्काच बसला. रजिस्टर पद्धतीने लग्न झाल्यानंतर आता स्वराला बॉलिवूड स्टाइल लग्न करायचे संपूर्ण रिती रिवाजानी. लवकरच दिल्लीमध्ये ते विधिवत लग्न करणार आहेत. मात्र तत्पूर्वी त्यांच्या लग्नाचे प्री वेडिंग फ़ंक्शन चालू आहेत.

नुकतेच स्वरा आणि फहद यांच्या लगांचे संगीत संपन्न झाले. त्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आता त्यांच्या लग्नच्या हळदीचे फोटो व्हायरल झाले आहेत. स्वराने देखील तिच्या हळदीच्या कार्यक्रमाचे काही फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये स्वरा आणि फहद दोघं हळदीच्या पिवळ्या रंगात न्हाहून निघाली आहेत. यासोबतच तिने एक रील देखील शेअर केले. यात त्यांच्या हळदीच्या कार्यक्रमाची झलक दिसली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

स्वराने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती फहदसोबत अतिशय रोमॅंटिक झालेली दिसली. याशिवाय ती खूप खुश देखील होती. या हळदीच्या कार्यक्रमासाठी तिने पिवळ्या आणि हिरव्या रंगाचा दुपट्टा असणारा पंधरा ड्रेस घातला होता तर फहद पांढऱ्या रंगाच्या कुर्ता पायजमात दिसला. या हळदीच्या कार्यमाला त्या दोघांनी खूप एन्जॉय केल्याचे या फोटो आणि व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. सोबतच उपस्थित पाहुण्यांनी देखील या कार्यक्रमाचा तुफान आनंद लुटला. हळदीसोबतच त्यांच्या लग्नात कदाचित होळी देखील साजरी झाल्याचे देखील यावेळी दिसले. हे फोटो पोस्ट करताना तिने “काही संस्कृतीमध्ये हळद, काहींमध्ये उबटन तर काही संस्कृतीमध्ये मिया, मात्र प्रेमाची भाषा सगळ्या संस्कृतीमध्ये समजली जाते.” असे कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

याशिवाय तिने तिच्या मेहेन्दीच्या फंक्शनचे देखील फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिने नार्णगि रंगाचा ड्रेस घालून केसांचा अंबाडा घालत त्यावर गजरा लावलेला दिसला. १६ मार्च रोजी स्वरा आणि फहद त्यांच्या लग्नच ग्रँड रिसेप्शन देणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नवऱ्यालाच शिकव म्हणजे झालं….,’ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा सून शिवानी रांगोळे हिला मजेशीर सल्ला
2 वर्षात 100 ट्यून बनवल्या, पण 9 च सिलेक्ट झाल्या; चित्रपटातील गाणी आणि नृत्याने रचला इतिहास

हे देखील वाचा