Tuesday, July 9, 2024

मराठी अभिनेता हरपला! ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम उज्वल धनगरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

आतापर्यंत जवळपास दीड वर्षापासून कोरोना व्हायरसने देशात थैमान घातले आहे. यादरम्यान अनेक वाईट गोष्टींना आपल्याला सामोरे जावे लागले आहे. अनेक दिग्गज कलाकारांचा कोरोनाने, हृदयविकाराने, वाढत्या वयाच्या आजाराने मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूणच चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. यादरम्यान काही मराठी दिग्गज कलाकारांनीही जगाचा निरोप घेतला. अशातच आता पुन्हा एकदा मन सुन्न करणारी वाईट बातमी समोर आली आहे. टीव्हीवरील प्रसिद्ध मराठी मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’मधील एका अभिनेता उज्वल धनगरचे सोमवारी (२८ जून) निधन झाले आहे. तो २८ वर्षांचा होता. त्याचे निधन हृदयविकाराने झाल्याचे वृत्त आहे. त्याच्या निधनाने संपूर्ण मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. (Swarajya Rakshak Sambhaji Fame actor Ujwal Dhangar passes away, Marathi celebrities mourn his demise)

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेता गौरव मोरे याने सोशल मीडियावर पोस्ट करून उज्वल धनगरचे निधन झाल्याची माहिती दिली.

गौरवने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये उज्वल रघुनाथ धनगरला टॅग करत लिहिले की, “भावपूर्ण श्रद्धांजली. आज सकाळी अभिनेता, निवेदक उज्वलचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.”

Photo Courtesy: Facebook/gaurav.more.12

याव्यतिरिक्त इतर कलाकारांनीही उज्वलच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अभिनेता प्रसाद खांडकेकरने उज्वलला श्रद्धांजली वाहत लिहिले की, “खूप शॉकिंग आहे हे, भावपूर्ण श्रद्धांजली.”

तसेच अभिनेता निखिल राऊतनेही “भावपूर्ण श्रद्धांजली” लिहित उज्वलच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

मराठमोळा अभिनेता उज्वल धनगरने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’व्यतिरिक्त ‘लक्ष्य’, ‘क्राईम पेट्रोल’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले होते. विशेष म्हणजे त्याने ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेत खाशाबाची भूमिका निभावली होती. तसेच अनेक कार्यक्रमांचे निवेदनही त्याने केले होते. व्यावसायाने तो एक निवेदकही होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नादच खुळा! श्रीदेवीची लाडकी लेक बनलीय ‘लालपरी’, फोटोवर बहीण सोनमसह इतर मैत्रिणींच्या हटके कमेंट्स

एका फोटोत केले चक्रासन, तर दुसऱ्यात पडलीय बेडवर; पाहा दीपिकाचे ‘एक्सपेक्टेशन वर्सेस रियॅलिटी’

-अभिमानास्पद! ‘स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार २०२१’ने उर्वशी रौतेलाचा गौरव; फोटो अन् व्हिडिओ केला शेअर

हे देखील वाचा