Monday, July 1, 2024

‘रणबेलिया’नंतर उडाला आणखी एका लग्नाचा बार, ‘या’ प्रसिद्ध जोडप्याने बांधली रेशीमगाठ

सध्या बॉलिवूड जगतात एकापाठोपाठ एक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकताना दिसत आहेत. नुकताच आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) विवाह सोहळा नुकताच धुमधडाक्यात पार पडला. या लग्नाचे फोटो आणि बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच, आता आणखी एका लग्नाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध सुत्रसंचालक, विजे आणि अभिनेता सायरस साहूकारने (Cyrus Sahukar) आपल्या प्रेयसी वैशाली मलहारासोबत (Vaishali Malhara) विवाह केला आहे. अनेक दिवसांपासून सायरस आणि वैशालीच्या प्रेम प्रकरणाची चर्चा सुरू होती. आता त्यांनी या चर्चांना पूर्णविराम देत लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला आहे.

सायरस आणि वैशालीने १५ एप्रिलला एकमेकांसोबत विवाह गाठ बांधली. निवडक मित्र मंडळी आणि कुटूंबियाच्या उपस्थित हा विवाह सोहळा अलिबागमध्ये पार पडला. लग्नाला श्रुती सेठ, मिनी माथुर, देवराज सान्याल, समीर कोचर यांच्यासह चित्रपट आणि मनोरंजन जगतातील अनेक कलाकार उपस्थित होते. त्यांच्या मित्रांनी या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. ज्यामध्ये सगळेच लग्नात धमाल करताना दिसत आहेत. तसेच लग्नाआधी त्यांनी डान्स करण्याचा आनंदही लुटल्याचे दिसत आहेत. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत.

या व्हायरल फोटोंमध्ये सायरसने गुलाबी रंगाची पगडी आणि पांढऱ्या रंगाची शेरवानी घातलेली दिसत आहे. या वराच्या पोशाखात तो खूपच राजबिंडा दिसत आहे. त्याचप्रमाणे वधू वैशालीने लाल रंगाची लेहंगा घातलेला दिसत आहे. या पेहरावात ती खूपच मनमोहक दिसत आहे. दोघांनी एक मेकांच्या हातात हात घालून कॅमेऱ्याकडे बघत सुंदर फोटोशूट केले आहे. त्याचबरोबर त्यांचे हळदीचे फोटोही चांगलेच व्हायरल होत आहेत.

दरम्यान सायरसच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सध्या तो अमेझॉन प्राईम व्हिडिओच्या ‘माइंड द मल्होत्रा’ ​​शोमध्ये मिनी माथुरसोबत दिसत आहे. सायरसने १९९९ मध्ये MTV मधून करिअरला सुरुवात केली. यानंतर तो अनेक शो होस्ट करताना दिसला. त्याचबरोबर सायरस ‘ओम जय जगदीश’, ‘रंग दे बसंती’, ‘दिल्ली ६’, ‘खूबसूरत’सह अनेक चित्रपटांमध्ये दिसला आहे.

हेही वाचा- 

हे देखील वाचा