‘तीन पदकं, तीन महिला…’, लव्हलिना बोर्गोहाइनने ऑलम्पिकमध्ये पदकाची कमाई केल्यानंतर, तापसी पन्नूने केलं महिलांचं कौतुक


सध्या संपूर्ण देशाचे लक्ष टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धांकडे लागले आहे. या स्पर्धांमध्ये भारताला आतापर्यंत दोन पदकं मिळाली असून, आज (४ ऑगस्ट) रोजी भारताला तिसरे पदक प्राप्त झाले आहे. भारताची बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहाइन हिने कांस्य पदकाची कमाई केली आहे. या पदकाच्या कमाईसोबत भारताच्या खात्यात तीन पदकं जमा झाली आहे. मुख्य म्हणजे हे तिन्ही पदकं पटकावले आहेत, त्या भारताच्या महिलांनी. या संदर्भात अभिनेत्री तापसी पन्नूने ट्वीट केले आहे.

तापसीने तिच्या ट्विटमध्ये लिहिले, “३ मेडल, तिन्ही महिला. लव्हलिना बोर्गोहाइन तू एक स्टार आहेस आणि तू खूपच आक्रमक आहेस.” असे ट्वीट करत तापसीने लव्हलिनाला शुभेच्छा देत, तिन्ही पदक विजेत्या महिलांचे कौतुक केले आहे. तापसीसोबतच अभिषेक बच्चन, फरहान अख्तर, उर्मिला मातोंडकर आदी कलाकारांनी देखील लव्हलिना बोर्गोहाइनचे कौतुक केले आहे.

महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत लव्हलिनाचा पराभव झाला. बुसेनाझ सुर्मीनेलीने लव्हलिनाचा पराभव केला. या पराभवामुळे लव्हलिनाला कांस्य पदक प्राप्त झाले. पदक पटकावल्यानंतर लव्हलिनावर संपूर्ण भारतीयांनी कौतुकाचा वर्षाव सुरु केला आहे.

भारताला यापूर्वी मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक, पी.व्ही. सिंधूने बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक आणि आता लव्हलिनाने बॉक्सिंगमध्ये कांस्य पदक मिळवून दिले आहे. विशेष म्हणजे मागील नऊ वर्षांमध्ये ऑलिम्पिक बॉक्सिंगमधील भारताचे हे पहिलेच पदक आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी लव्हलिना तिसरी भारतीय बॉक्सर बनली आहे.

तापसीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर ती लवकरच भारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप्टन असलेल्या मिताली राजच्या भूमिकेत ‘शाबास मिठू’ सिनेमात दिसणार आहे. तत्पूर्वी तापसीचा ‘हसीन दिलरुबा’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. याला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तेजस्विनी पंडितच्या ‘कूल ऍंड डॅशिंग’ लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष, कलाकारांच्या देखील उमटतायेत प्रतिक्रिया

-निळ्या रंगाच्या साडीमध्ये खुललं मृण्मयी देशपाडेचं रूप, फोटोवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

-मयुरी देशमुखच्या नव्या लूकने वेधले चाहत्यांचे मन; काळ्या डॉटेड पोल्कोमधील फोटो झाला व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.