Wednesday, June 26, 2024

‘लाज वाटत नाही का’ म्हणत नेटकऱ्यांनी तापसी पन्नूच्या ‘त्या’ नेकलेसवरून घेतली तिची शाळा

बॉलिवूडमधील अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या अभिनयसोबतच तिच्या विविध वक्तव्यांमुळे देखील ओळखली जाते. तापसी नेहमीच सोशल मीडियावर तिचे विचार अगदी मोकळेपणाने मांडत असते. प्रभावी अभिनयासोबतच तिच्या पोस्ट आणि तिची व्यक्तव्य देखील तिला लाइमलाईट्मधे आणतात. सोशल मीडियावर देखील तिचा वावर चांगला आहे. टी सतत तिचे फोटो शेअर करत असते. अशातच आता तिने तिचे लॅक्मे फॅशन वीकमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवरून आता तिला नेटकाऱ्यानी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

या फॅशन शोमध्ये तापसी पन्नूने मोनिशा जयसिंगने डिझाईन केलेला डिझायनर ड्रेस घालत तिने रॅम्प वर वॉक केला. तिने लाल रंगाचा डीप नेक असलेला इवनिंग गाऊन घातला होता. मात्र तिच्या ड्रेसपेक्षा जास्त लक्ष तिच्या ज्वेलरीने वेधून घेतले. तिने एका मोठ्या ब्रँडच्या अक्षय तृतीया कलेक्शनमधील एक नेकलेस घातला होता, ज्यावर लक्ष्मी देवीचे चित्र होते. डिपनेक ड्रेसवर लक्ष्मी देवीचे चित्र असणारा ड्रेस घातल्यामुळे तिला आता ट्रोल केले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

तापसीच्या ड्रेसवर कमेंट करताना एकाने लिहिले, “अशा वल्गर ड्रेसवर माता लक्ष्मीचा हार घातला आहे. तुला लाज वाटत नाही का?’, अजून एकाने लिहिले, “हे लोकं आपल्या सनातन धर्मालाच टार्गेट करतात. लाज वाटायला पाहिजे होती हा हार घालताना.” तर एकाने लिहले, “देवाचे चित्र असणारा नेकलेस घाणेरड्या ड्रेसवर घातला आहे, थोडी तर लाज वाटू द्या.”

दरम्यान यावर अजून तापसीकडून काहीही उत्तर आलेले नाही. तिच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास ती अनुभव सिन्हाच्या ‘अफ़वाह’मध्ये दिसणार आहे. ‘फिर आई हसीना दिलरुबा’ या सिनेमात देखील ती दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पॅपराझींना पोज दिल्याने सैफ करीनावर रागावला? अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा
रजनीकांत यांच्या मुलीचे लग्नातील लाखोंचे दागिने चोरीला; ‘या’ व्यक्तिवर व्यक्त केला संशय

हे देखील वाचा