Tuesday, October 14, 2025
Home टेलिव्हिजन ‘तारक मेहता’ मध्ये भूतणी आली…आणि टीआरपीला ब्रेकच लागला नाही!

‘तारक मेहता’ मध्ये भूतणी आली…आणि टीआरपीला ब्रेकच लागला नाही!

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये अलीकडेच भूतणीचा मजेशीर ट्रॅक दाखवला गेला. या भागात स्वाती भूतणीच्या रूपात दिसली होती.‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये अलीकडेच भूतणीचा एक मजेशीर ट्रॅक दाखवला गेला. या भागात अभिनेत्री स्वाती शर्माने (Swati Sharma) भूतणीची भूमिका केली होती. प्रेक्षकांना हा ट्रॅक खूप आवडला आणि त्यामुळे शो टीआरपीत नंबर वन झाला.आता स्वाती शर्मानेही यावर बोलत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

स्वाती म्हणाली की,शूटिंगच्या वेळी ती थोडी घाबरली होती. ती म्हणाली, “मला एकीकडे खूप एक्साइटमेंट होती आणि दुसरीकडे थोडं टेन्शन पण. जेव्हा मी पहिल्यांदा सेटवर गेले,तेव्हा सगळंच नवीन वाटत होतं. सेटवरची एनर्जी खूप धमाल होती, पण मी माझ्या सीनबाबत थोडी चिंतेत होते सगळं नीट होईल ना,याचं प्रेशर होतं.पण जेव्हा एकदा मी मूडमध्ये आले,तेव्हा कास्ट आणि क्रूने खूप सपोर्ट केला. त्यांनी मला खूप कंफर्टेबल वाटायला लावलं. जसजसा वेळ गेला,तसं मी काम एन्जॉय करायला लागले.हा माझ्यासाठी खूप खास अनुभव होता.पहिल्याच दिवसापासून मी खूप काही शिकले”.

दिलीप जोशी सरांसोबत काम करण्याची संधी न मिळाल्याबद्दल स्वाती म्हणाली,”हो, मला तो चान्स मिळालाच नाही.मी दिलीप सरांसोबत काम करू शकले नाही.मला खरंच वाटत होतं की ते ट्रॅकदरम्यान शोमध्ये असते तर अजून मजा आली असती. जेव्हा मी दिलीप सरांचा विचार करते, तेव्हा मला लगेच त्यांचा आणि दयाचा डान्स आठवतो. ते असते तर अनुभव आणखीनच खास झाला असता”.

सेटवरच्या अनुभवाबद्दल स्वाती म्हणाली,”सेटवर सगळेजण खूपच प्रेमाने आणि आपुलकीने वागले. त्यांनी मला सीन चांगला करायला प्रोत्साहन दिलं. श्यामजी सतत विचारत होते की मी कम्फर्टेबल आहे का. मंदार सरांनी माझं काम आवडलं म्हणत कौतुक केलं,आणि सोनालिका मॅमनी माझ्या लुकचंही तोंडभरून कौतुक केलं. तेव्हा माझी तब्येत थोडी बरी नव्हती, पण सगळ्यांनी माझी काळजी घेतली, वारंवार विचारलं की तब्येत कशी आहे. त्यांनी मला उपयोगी सल्लेही दिले,आणि मला खरंच असं वाटलं की मी कुठल्या तरी आपल्या घरच्यांसोबत काम करतेय”.

दिलीप जोशींसोबत काम करण्याची संधी न मिळाल्याबद्दल ती म्हणाली,”हो, मला त्यांच्यासोबत काम करता आलं नाही,आणि त्याचं थोडं वाईटही वाटलं. माझी इच्छा होती की तेही या ट्रॅकदरम्यान शोमध्ये असते. जेव्हा मी त्यांच्याबद्दल विचार करते,तेव्हा त्यांच्या आणि दयाच्या डान्सचा सीन डोळ्यांसमोर येतो. ते असते, तर अजूनच धमाल आली असती”.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

सलमान खानने विकला मुंबईतील त्याचा आलिशान फ्लॅट, मिळाली इतकी किंमत

हे देखील वाचा