Sunday, July 14, 2024

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेतील ‘हे’ कलाकार अजूनही आहेत अविवाहित, जाणून घ्या संपूर्ण यादी

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय मालिका मानली जाते. आतापर्यंतच्या कारकिर्दीत या मालिकेएवढी प्रसिद्धी कोणत्याच मालिकेला मिळालेले नाही. २००८ मध्ये सुरू केलेली ही मालिका अजूनही प्रेक्षकांना तितकीच खेळवून ठेवत आहे. त्या मालिकेमध्ये एकापेक्षा एक उत्तम अभिनेते आहेत जेठालालची व्यक्तिरेखा साकारणारे दिलीप जोशीपासून बापुजी बनलेले अमित भट्ट यासारखे कसलेले कलाकार आहेत.

याच मालिकेतील काही कलाकार अजूनही अविवाहित आहेत. यातील मुख्य नाव म्हणजे मुनमुन दत्ता. मुनमुन दत्ता या ३४ वर्षाच्या आहेत  आणि अजूनही अविवाहित आहेत. मुनमुन दत्ता या मालिकेत बबीताजी ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. या यादीत दुसरं नाव येतं ते म्हणजे नेहा मेहता. या मालिकेत अंजली भाभीचे पात्र साकारत आहेत. अंजली भाभी ही व्यक्तिरेखा आता नेहा साकारत नसून तिच्या जागी सुनेना फौजदार  ही अभिनेत्री ही व्यक्तिरेखा साकारत आहे. (taarak mehta ka oolta chashma unmarried actors)

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील अविवाहित यादीत अभिनेता तनुज महाशब्दे देखील सामील आहे. तनुज महाशब्दे या मालिकेत मिस्टर अय्यर ही व्यक्तिरेखा साकारताना दिसतो. याच मालिकेत डॉक्टरची भूमिका साकारणारे निर्मल सोनी हे देखील अविवाहित आहेत. त्यांचे वय साधारण चाळीस वर्ष आहे. ते एका योग्य जोडीदाराच्या शोधात आहेत. उत्तम जोडीदार मिळाला की, विवाह करू असं त्यांचं म्हणणं आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका क्षेत्रातील सर्वोत्तम टीआरपी असलेली मालिका आहे. या मालिकेने जागतिक विक्रम केलेला आहे.

हेही वाचा :

यशराज मुखाटेने केला शहनाझ गिलसोबत मजेशीर व्हिडिओ शेअर, हसून हसून तुम्हीही व्हाल लोटपोट

महत्वाची बातमी! अभिनेत्री जुही चावला अडकली कायद्याच्या कचाट्यात, भरावा लागेल लाखोंचा दंड

तेजस्विनी पंडीतला ‘या’ कारणामुळे आई घराबाहेर काढण्याची वाटते भीती, सोशल मीडियावर सांगितले कारण

 

 

हे देखील वाचा