‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेली अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेमुळे अनेक कलाकारांना रोजगार मिळाला. तसेच या मालिकेतील प्रत्येक कलाकार हे स्वतःच्या अभिनयाला पूर्णपणे न्याय देणारे आहेत. यामध्ये गेली बरेच कलाकार आधी पासून काम करत आहेत. त्यामुळे आता ते प्रत्येक घराघरात पोहोचले आहेत. अशात काही कलाकारांनी या मालिकेमधून निरोप घेतला आहे. यामध्ये अभिनेते गुरुचरण सिंग हे देखील आहेत.
गुरुचरण सिंग यांनी या मालिकेसाठी जीव ओतून अभिनय केला. त्यांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडायचा. पण साल २०२० मध्ये त्यांनी या मालिकेमध्ये काम करणे सोडून दिले. त्यांच्या अभिनयामुळे अनेक चाहते त्यांची आतुरतेने वाट पाहात आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ते रोशन सोढी हे पात्र साकारत होते. (taarak mehta ka ooltah chashmah actor gurucharan singh aka sodhi ji hints at his return)
नुकतेच एका वृत्तपत्राला त्यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी ही मालिका सोडण्याचे कारण सांगितले. तसेच त्यांनी या मालिकेत पुन्हा केव्हा येणार याचाही खुलासा केला आहे.
गुरुचरण सिंग यांना मुलाखतीमध्ये मालिका सोडण्याचे कारण विचारले, तेव्हा उत्तर देत ते म्हणाले की, “मी ही मालिका माझे वडील आजारी होते त्यामुळे सोडली. तसेच माझ्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडत होत्या, त्यामुळे मला त्यांच्याकडे लक्ष देणे जास्त महत्वाचे वाटत होते.” मालिकेमध्ये त्यांचे पात्र आतापर्यंत दोन कलाकारांनी साकारले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, “माझ्या नंतर ज्या दोन कलाकारांनी रोशन सोढी हे पात्र साकारले त्यांना मी हेच सांगितले की, ही तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. तुम्हाला ती व्यवस्थित हाताळता आली पाहिजे. त्यानंतर त्यांना मालिकेमध्ये पुन्हा केव्हा परतणार असे विचारले असता उत्तर देत त्यांनी असे सांगितले की, “सध्या सर्व काही ठीक आहे. देवाची इच्छा असेल, तर मी नक्की पुन्हा येईल. पण सध्या तरी असे काही नाही.”
गुरुचरण सिंग यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनामध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे अनेक जण अजूनही मालिकेमध्ये ते केव्हा येणार याची वाट पाहत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-हिना खानचा ब्रेकअप? अभिनेत्रीच्या लेटेस्ट पोस्टमुळे चाहते पडले चिंतेत
-आर्यन खानला सकाळी ७ वाजता मिळणार जेलमधील जेवण, ‘या’ गोष्टीसाठी तरसणार शाहरुखचा मुलगा
-‘हे नक्की शाल्विताच का?’ ओम अन् स्वीटूच्या ‘त्या’ व्हिडिओवर रंगल्यात चाहत्यांच्या चर्चा