Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

अखेर मुनमुन दत्ताने शेअर केला तिच्या जोडीदाराचाच व्हिडिओ

सोनी टीव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेली अनेक वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले असून कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. या मालिकेतील अभिनेत्री मुनमुन दत्ता म्हणजेच अय्यरच्या पत्नीची भूमिका साकारणारी बबिता सर्वांनाच खूप आवडते. आपल्या घायाळ करणार्‍या सौंदर्याने मुनमुन दत्ता नेहमीच चाहत्यांना मोहित करते. नुकताच मुनमुन दत्ताने सोशल मीडियावर एक रोमॅंन्टिक व्हिडीओ शेअर केला करत तिच्या खऱ्या आयुष्याचा जोडीदार त्यामध्ये दाखवला आहे. नक्की कोण आहे बबिताचा खरा जोडीदार चला जाणून घेऊ.

टीव्हीवरील सगळ्यात लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ ही मालिका ओळखली जाते. त्याचबरोबर टीव्ही वरील दीर्घकाळ चालणारी मालिका म्हणूनही ही ओळख जाते. मालिकेत अय्यरच्या पत्नीची भूमिका करणारी मुनमुन दत्ता म्हणजेच बबिता सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ती नेहमी अनेक फोटो चाहत्यांशी शेअर करत असते. नुकताच मुनमुनने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मुनमुन हल्क सोबत असल्याचे दिसत आहे. या प्रसिद्ध कार्टूनसोबत मुनमुन दत्ता प्रश्नमंजुषा खेळत आहे. या फोटो सोबतच तिने “शेवटी मी माझ्या जोडीदारासोबत हा ट्रेंड पूर्ण केला” असे कॅप्शन लिहिले आहे. सध्या हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

तत्पूर्वी अभिनेत्री मुनमुन दत्ता आणि ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील टप्पुच्या भूमिकेत असलेला अभिनेता राज अंदकतच्या प्रेम प्रकरणाची जोरदार अफवा माध्यमांत रंगली होती. यानंतर संतापलेल्या मुनमुन दत्ताने सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. सोबतच या सगळया बातम्या खोट्या असल्याचा ही खुलासा केला होता.

यावेळी मुनमुनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन लिहले होते की, “सकारात्मक गोष्टी सोबत पुढे जाऊया, जगा आणि जगू द्या. सगळ्यांना प्रेम, शांती आणि स्वास्थ्य लाभो. गणपती बाप्पा मोरया, जय माता दी” यामध्ये मुनमुन पुढे लिहिते की “तुम्हाला काल्पनिक बातम्या पसरवायचा अधिकार कोणी दिला. तुम्ही एखाद्याच्या परवानगीशिवाय त्याच्याबद्दल बातम्या कशा लिहू शकता. तुमच्यामुळे जो मानसिक त्रास होतो याला दोषी कोण? ” असे म्हणत तिने या बातम्यांबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

याबद्दल पुढे बोलताना मुनमुनने माध्यमांविरोधात संताप व्यक्त केला ज्यामध्ये ती म्हणते की” तुम्ही एखाद्याच्या अंत्ययात्रेत सुद्धा टीआरपीसाठी मुलगी किंवा प्रियकर गमावलेल्या दुःखी महिलेच्या चेहर्‍यावर कॅमेरा धरायला धजावत नाही. तुम्ही तुमच्या बातम्या संवेदनशील बनवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकता. परंतु त्या लोकांच्या आयुष्यात आलेल्या अडचणींची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? जर नसाल घेणार तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे” अशा शब्दात मुनमुनने आपला रोष व्यक्त केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रसिद्ध डिझायनर सब्यासाचीला मंगळसुत्राची जाहिरात करणे पडले महागात,धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल

-छळ आणि दुसरे लग्न केल्याच्या आरोपाखाली ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला अटक, पत्नीने केला होता गुन्हा दाखल

-खान कुटुंबाची ‘मन्नत’ पूर्ण! अखेर २७व्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात झाले आर्यन खानचे स्वागत

हे देखील वाचा