Sunday, June 1, 2025
Home टेलिव्हिजन हे कसे काय बुवा! ‘आक्रमण’ म्हणत विद्यार्थ्यांनीच केले भिडे सरांना टार्गेट, यावर मास्टर म्हणतात ‘हाच’ बेस्ट शॉट

हे कसे काय बुवा! ‘आक्रमण’ म्हणत विद्यार्थ्यांनीच केले भिडे सरांना टार्गेट, यावर मास्टर म्हणतात ‘हाच’ बेस्ट शॉट

नुकताच आपण सर्वानी मोठ्या धुमधडाक्यात होळीचा सण साजरा केला. मात्र टेलिव्हिजन विषयातील मालिकांमध्ये अजूनही होळीचा सण साजरा होत आहे. काही मालिकांमध्ये या सांची सुरुवात झाली आहे तर काही मालिकांमध्ये अजून सुरुवातच व्हायची आहे. टीव्ही जगतातील टॉपचा आणि लोकप्रिय शो असणाऱ्या तारक मेहता का उलटा चश्मामध्ये देखील सध्या होळीची धूम सुरु आहे. तारक मेहता मधील होळी म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळे आणि मस्त असणार हे सगळ्यांनाच माहित झाले आहे. या मालिकेत प्रत्येक सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. होळी देखील मोठ्या जल्लोषात साजरी केली जात आहे.

तारक मेहता…मालिकेत भिडे सरांची भूमिका साकारणाऱ्या मंदार चांदवडकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये गोकुळधम्मधील धमाकेदार होळीची झलक पाहायला मिळत आहे. मंदार यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये टप्पू सेनेने भिडे सरांना त्यांचे लक्ष केल्याचे दिसत आहे. मालिकेत होळीच्या शूटिंग दरम्यानचा हा व्हिडिओ सध्या तुफान गाजत आहे.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये भिडे सर होळीसाठी मस्त तयार होऊन येतात आणि म्हणतात, “अरे कमाल आहे, अजून कोणी कसे नाही आले होळी खेळायला?” इतक्यातच लपून बसलेल्या टप्पू सेनेने ‘आक्रमण’ म्हणत त्यांच्यावर रंगाचा वर्षाव केला. तर हातातल्या पिचकारीने त्यांच्यावर पाणी उडवले. हे पाहून भिडे सर जोरात ओरडतात आणि थांबण्याचा इशारा करतात. मात्र टप्पू, गोगी, गोली अजिबात थांबत नाही, आणि मग सोनू मध्ये येत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते.

हा व्हिडिओ खुद्द मंदार चांदवडकर यांनीच त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “होळीच्या शुटिंगमधील हा एक बेस्ट शॉट होता. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? शूटिंगसाठी मला देखील अशाच प्रकारे चार दिवस सवतःला मेंटेन ठेवावे लागले. मात्र काहीच समस्या नाही. कारण हे पाहून आमचे प्रेक्षक एन्जॉय करत आहे. फन वर्क.” त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत हा भाग पाहण्यासाठी आता वाट पाहू शकत नसल्याचे सांगितले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सतीश कौशिक यांच्यावर संपूर्ण सीने इन्डस्ट्रीजचे कलाकार करायचे प्रेम, सोशलवर आलाय श्रद्धांजलीचा पूर्, अनेकांना अश्रू अनावर
‘विवाह’ फेम पूनम म्हणजेच अभिनेत्री अमृता राव एका जाहिरातीसाठी घेते एवढे पैसे; करोडो संपत्तीची आहे मालकीण 

हे देखील वाचा