Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

TMKOC | पडद्यावर कट्टर मैत्री निभावणारे ‘तारक मेहता’ अन् ‘जेठालाल’, खऱ्या आयुष्यात एकमेकांचं तोंडही बघणं करतात नापसंत

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात हिट आणि लोकप्रिय शोपैकी एक आहे. या शोने टीआरपीच्या बाबतीत सर्वांनाच मागे टाकले आहे. या शोमधील प्रत्येक पात्र चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते. या शोची लोकप्रियता केवळ देशापुरती मर्यादित नाही, तर परदेशातही या शोमधील प्रत्येक पात्राला आणि शोला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळत आहे. या शोच्या इतक्या लांबच्या प्रवासात अनेक नवे चेहरे या शोमध्ये सामील झाले असून, जुन्या चेहऱ्यांनी निरोप घेतला आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये, प्रेक्षक जेठालाल आणि तारक मेहताच्या मैत्रीची उदाहरणे देतात. परंतु तुम्हाला माहित आहे का की, खऱ्या आयुष्यात या दोन्ही पात्रांना एकमेकांशी बोलणे देखील आवडत नाही.

माध्यमांतील वृत्तानुसार, जेठालाल आणि तारक मेहताची ही मैत्री प्रेक्षकांना पडद्यावरच पाहायला मिळते. कारण जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी (Dilip Joshi) आणि तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांच्यात काही ठीक नसल्याच्या बातम्या येत आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, दिलीप जोशी आणि शैलेश लोढा अनेक दिवसांपासून एकमेकांवर नाराज आहेत. इतकंच नाही, तर नाराजीमुळे दोन्ही स्टार्स शूटिंगच्या वेळी एकत्र दिसतात. पण शूटिंग संपल्यावर दिलीप आणि शैलेश आपापल्या व्हॅनिटीकडे चालत जातात.

माध्यमांतील वृत्तानुसार, शैलेश लोढा आणि दिलीप जोशी या दोघांमधील ही लढत बरीच जुनी आहे, जी अजूनही कायम आहे. शैलेश आणि दिलीप हे दोघेही अनुभवी अभिनेते आहेत. त्यामुळेच ते त्यांच्यातील हा दुरावा पडद्यावर अजिबात दिसू देत नाहीत. या शोमधील दोघांमधील जुगलबंदी प्रेक्षकांना खूप आवडते. जे पाहून खऱ्या आयुष्यात शैलेश आणि दिलीप यांच्यात काही मतभेद आहेत यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही टीव्हीवरील नंबर वन कॉमेडी मालिका आहे. ही मालिका अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेतील साधी आणि मजेदार कथा चाहत्यांना आवडते. विशेष म्हणजे, या कथेत दिसणारे पात्रंही आपल्या दमदार अभिनयामुळे चाहत्यांमध्ये अधिराज्य गाजवतात.

हेही वाचा

हेही पाहा-

 

हे देखील वाचा