Saturday, July 6, 2024

लईच वाईट झालं राव! ‘तारक मेहता…’ फेम ‘नट्टू काका’ काळाच्या पडद्याआड; कँसरने घेतला जीव

टेलिव्हिजनवरील सर्वाधिक काळ चालणारा आणि प्रेक्षकांना खदखदून हसवणारा शो म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोला ओळखले जाते. मात्र, या शोमधील एका कलाकाराने सर्वांनाच रडवण्यास भाग पाडले आहे. कारण सर्वांचे आवडते नट्टू काका म्हणजेच घनश्याम नायक यांचे रविवारी (३ ऑक्टोबर) निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. ते मागील काही दिवसांपासून गळ्याच्या कँसने ग्रस्त होते. मागील वर्षी यासंबंधित त्यांचे ऑपरेशन झाले होते. मात्र, ते कँसरमधून बरे होऊ शकले नाहीत. रविवारी मुंबईच्या मालाड येथील रुग्णालयात सायंकाळी ५.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नट्टू काका मुंबईच्या मालाड भागात राहायचे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील त्यांच्या पात्रामुळे ते घराघरात पोहोचले होते. या शोचे निर्माते असित मोदींनी माध्यमांशी बोलताना नट्टू काकांच्या निधनाची पुष्टी केली. (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Fame Actor Nattu Kaka AKA Ghanshyam Nayak Passes Away At Age 67)

त्यांनी नट्टू काका म्हणजेच घनश्याम यांची आठवण काढत म्हटले की, “घनश्याम हे आमच्यासोबत सन २००१ पासून जोडले होते. माझे आणि त्यांचे नाते खूपच चांगले होते. एकप्रकारे कौटुंबिक नातेच होते. माझ्यावरच नाही, तर शोच्या संपूर्ण युनिटवर त्यांचा आशीर्वाद होता आणि आम्ही सर्व मिळून हसत- खेळत काम करायचो. ते खूपच प्रेमळ आणि चांगले व्यक्ती होते. आम्हा सर्वांना त्यांची खूप आठवण येईल.”

असित मोदींना यावेळी एक प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर देताना ते म्हणाले की, “घनश्याम नायक यांनी आमच्यासोबत सेटवर शेवटचे ३- ४ महिन्यांपूर्वी काम केले होते. बिघडत्या तब्येतीमुळे ते शूटिंग करू शकत नव्हते.”

https://twitter.com/Wahmodijiwaah56/status/1444652483666534405

विशेष म्हणजे लॉकडाऊनमध्ये त्यांची परिस्थिती खूपच बिघडली होती. माध्यमांशी बोलताना घनश्याम नायक यांनी सांगितले होते की, “कोरोनामुळे सगळी शूटिंग सध्या बंद आहे. यानंतर शूटिंग कधी चालू होणार आहे. तसेच यासाठी त्यांना बोलवले जाईल की नाही, याबाबत काहीच माहिती नाहीये.” पुढे घनश्याम यांनी सांगितले होते की, “मी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात शूटिंग केली आहे. तेव्हापासून मी घरीच आहे. मालिकेच्या निर्मात्यांनी शूटिंगची जागा बदलण्याबाबत देखील काहीच माहिती दिली नाहीये.”

“वय जास्त झाल्याने आता घरच्यांना काळजी वाटत आहे. त्यामुळे घरच्यांनी मला घराच्या बाहेर जाऊ नका, असे सांगितले आहे. परंतु माझी सेटवर परत यायची खूप इच्छा आहे,” असेही त्यांनी पुढे म्हटले होते.

त्यांच्या निधनामुळे टीव्ही इंडस्ट्रीचे मोठे नुकसान झाले आहे. चाहते तसेच कलाकार त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मोठी बातमी! शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला कोर्टाने दिली एक दिवसाची एनसीबी कस्टडी

-क्रूझ ड्रग्ज पार्टीत शाहरुख खानच्या मुलाला घेऊन जाणारा अरबाज मर्चंट आहे तरी कोण?

-आमिर खानची लाडकी लेक आयरा डिप्रेशननंतर करतेय नवीन समस्यांचा सामना; म्हणाली, ‘…तोपर्यंत फक्त रडत राहिले’

हे देखील वाचा