‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘ या मालिकेतून ओळख निर्माण करणारा अभिनेता सुनील होळकर यांच्या निधनामुळे टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. वयाच्या 40 व्या वर्षी त्यांचे असे अचानक जाणे सर्वांनाच हळहळणारे आहे. सुनील होळकर यांच्या आधी ‘तारक मेहता’शी संबंधित अनेक दिग्गजांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. चला जाणून घेऊया त्या स्टार्सबद्दल जे आज आपल्यासोबत नसले तरी चाहत्यांच्या मनात कायम जीवंत आहे.
सुनील होळकर
तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये सुनील होळकर (sunil holkar) यांनी आपल्या खास अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली होती. माध्यमातील वृत्तानुसार, सुनील होळकर लिव्हर सिरोसिसने त्रस्त होते. ते सतत डॉक्टरांचा सल्ला घेत हाेते. मात्र, तरीदेखील ते जगू शकले नाहीत आणि शुक्रवारी (दि. 13 जानेवारी) रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
डॉ. हाथी
सोनी सब वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमधून कवी कुमारला खूप लोकप्रियता मिळाली.
आपल्या अभिनय कौशल्याने आणि हृदयस्पर्शी शैलीने सर्वांना हसवणारे डॉ. हाथींचे 2018 साली निधन झाले. या शोशिवाय ते आमिर खान स्टारर ‘मेला’ आणि ‘फुंटूश’ या चित्रपटांमध्येही दिसले होते. त्यांच्या निधनाने सर्वांनाच खूप माेठा धक्का बसला हाेता. कवी कुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता.
‘नट्टू काका’ उर्फ घनश्याम नायक
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे ‘नट्टू काका’ उर्फ घनश्याम नायक यांनीही या जगाचा कायमचा निरोप घेतला. 3 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांचे निधन झाले. ते 77 वर्षांचे होते आणि दीर्घकाळापासून कर्करोगासारख्या घातक आजाराशी लढत होते.
प्रॉडक्शन कंट्रोलर हेडनेही घेतला निरोप
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे प्रॉडक्शन कंट्रोलर प्रमुख अरविंद मार्कंडेय यांनीही 2016मध्ये जगाचा निराेप घेतला. या शोमध्ये ते दिसले नसले तरी त्यांची प्रतिभा सर्वश्रुत होती. अरविंद मार्कंडेय यांचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. (taarak mehta ka ooltah chashmah fame actor sunil holkar passes away kavi kumar azad aka hathi and ghanshyam nayak aka nattu kaka also died during shooting)
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सुश्मिता सेनचे मित्र आणि आयपीएलचे संस्थापक ललित मोदी ऑक्सिजन सपोर्टवर
राखी सावंत अन् आदिलचा लिपलॉक व्हिडिओ व्हायरल; लोक म्हणाले, ‘इस्लामची राजकुमारी’










