छोट्या पडद्यावर अनेक प्रकारचे कॉमेडी मालिका येतात, जे लोकांचे खूप मनोरंजन करतात. त्यातील एक म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका सन 2008 पासून प्रेक्षकांना हसवत आहे. विशेष म्हणजे, हा शो केवळ मुलेच नाही, तर संपूर्ण कुटुंब एकत्र मिळून पाहतात. मालिकेची कहाणी मुंबईतील गोकुळधाम सोसायटीमधील दैनंदिन किस्स्यांवर आधारित आहे. या मालिकेमधील सर्व पात्र एकापेक्षा एक आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘बापूजी.’ बापूजीलाही प्रेक्षकांनी खूप पसंत केले आहे. बापूजी म्हणजे चंपकलाल. त्याचे खरे नाव अमित भट्ट आहे. आज आम्ही तुम्हाला बापूजीच्या वास्तविक जीवनाविषयी काही मनोरंजक गोष्टी सांगणार आहोत.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ शोमध्ये अमित भट्ट एक वयस्कर व्यक्तीची भूमिका साकारत आहे. पण खऱ्या आयुष्यात तो एक रोमँटिक पती आहे. त्याचे फोटो पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की, अमित भट्ट किती रोमँटिक स्वभावाचा आहे. त्याची पत्नीसुद्धा सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. त्याच्या पत्नीचे नाव क्रिती भट्ट आहे. अमितला दोन मुलंही आहेत, जे जुळे आहेत.
अमित भट्ट हा गुजरातच्या सौराष्ट्रचा रहिवासी आहे. वास्तविक जीवनात तो 48 वर्षांचा आहे, परंतु वयाच्या 36 व्या वर्षी त्याने जेठालालच्या वडिलांची भूमिका साकारली. त्याचबरोबर तो वास्तविक जीवनात ऑनस्क्रीन मुलापेक्षा म्हणजे ‘जेठालाल’ दिलीप जोशीपेक्षा वयाने लहान आहे, परंतु दोघांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली आहे.
अमित भट्ट यापूर्वीही बर्याच मालिकांमध्ये दिसला आहे, पण ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे ‘बापूजी’ बनून त्याला खरी ओळख मिळाली. या भूमिकेसाठी अमित भट्टला ऑडिशन देण्याचीही गरज पडली नव्हती. अमितची ऑडिशन न घेता निवड झाली होती. तो तब्बल 12 वर्षांपासून हे पात्र साकारत आहे.
एका मुलाखतीदरम्यान बापूजी म्हणजेच अमित भट्टने सांगितले होते की, बापूजीच्या भूमिकेसाठी निर्मात्यांना त्याचे नाव दिलीप जोशी यांनी सुचवले होते. यानंतर अमित भट्ट निर्मात्याला एका हॉटेलमध्ये भेटला आणि बापूजीच्या भूमिकेसाठी त्याला साईन करण्यात आले. शोमध्ये दिलीप जोशी त्याचा मुलगा जेठालालच्या भूमिकेत आहेत.
अमित भट्टचे फोटो सोशल मीडियावर बऱ्याचदा पाहिले जातात. त्याच्या मुलांचे आणि पत्नीचे फोटो चाहतेही सोशल मीडियावर शेअर करत असतात. अमितच्या रील आणि रियल जीवनाचे फोटो पाहून लोक आश्चर्यचकित होतात. इतकेच नव्हे, तर त्याचे फोटो पाहून बर्याच युजर्सने त्याची तुलना शाहरुख खानशीही करण्यास सुरुवात केली.
वृत्तानुसार, अमित भट्टला प्रत्येक एपिसोडसाठी 70-80 हजार रुपये मिळतात. शोमधील त्याच्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून खूप कौतुक होते. अमितकडे टोयोटा, इनोव्हा क्रिस्टा अशा गाड्या आहेत. त्याने ‘खिचडी’, ‘येस बॉस’, ‘चुपके चुपके’, ‘फनी फॅमिली डॉट कॉम’, ‘गपशप कॉफी शॉप’ आणि ‘एफआयआर’ यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय सलमान खानच्या फिल्म ‘लव्हयात्री’ मध्येही अमित दिसला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-