प्रसिद्ध टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ बर्याच वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आला आहे. गेल्या १३ वर्षांपासून या शोने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. या शोच्या प्रत्येक पात्राने चाहत्यांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मग ते जेठालालची भूमिका करणारे दिलीप जोशी असोत किंवा दयाबेनची भूमिका करणारी दिशा वकानी असो. सर्वांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
अभिनेत्री दिशा वकानी ही एकेकाळी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोची ओळख होती. या शोमध्ये ती जेठालालची पत्नी दयाबेनची भूमिका करत होती. लग्नानंतर दिशा वकानी शोपासून दूर राहून वैयक्तिक आयुष्यात सक्रिय झाली आहे. (taarak mehta ka ooltah chashmah fame disha vakani aka dayaben husband trolled
पुन्हा कधी येणार नाही दिशा
दिशा वकानीने आई होण्याचा निर्णय घेतला आणि बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही ती शोमध्ये परतली नाही. चाहत्यांना वाटले की, कदाचित दिशा वकानी प्रसूती रजेनंतर शोमध्ये परतेल. पण तसे होऊ शकले नाही. अलीकडेच, अभिनेत्रीचे असे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत, ज्यात ती तिच्या मुलासोबत दिसत आहे.
चाहत्यांनी साधला पतीवर निशाणा
या फोटोमध्ये दिशाचे वजन खूप वाढले आहे, ज्याचा अंदाज आपण तिच्या चेहऱ्यावरूनही लावू शकतो. दिशा वकानीच्या या फोटोवरून तिच्या पतीला प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे. कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी दिशा वकानीच्या करिअरच्या बरबादीसाठी तिच्या पतीला जबाबदार धरले आहे.
पतीला का केलं जातंय ट्रोल?
एका यूजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, “तिच्या पतीने तिचं करिअर उद्ध्वस्त केलं.” आणखी एका युजरने लिहिले की, “पती आणि मुलामध्येच गोंधळून गेली.” त्याचप्रमाणे एका यूजरने कमेंट केली की, “कुटुंबामुळेच करिअर गेले.” युजर्सने अशा कमेंट्स केल्या आहेत आणि दिशा वकानीच्या पतीवर तिचे करिअर बरबाद केल्याचा आरोपही केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-